मनिष पॉलला 'ह्या' कारणासाठी मिळाल्या अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:59 IST2018-08-23T11:59:07+5:302018-08-23T11:59:52+5:30

अभिनेता मनीष पॉलने 'ब्लॅक ब्रिफकेस' या लघुपटामध्ये पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. या लघुपटासाठी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Amitabh Bachchan wishes Manish Paul for his new short film | मनिष पॉलला 'ह्या' कारणासाठी मिळाल्या अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा

मनिष पॉलला 'ह्या' कारणासाठी मिळाल्या अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा

ठळक मुद्देमनीष पॉल पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत

अभिनेता मनिष पॉलने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता मनीष एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे. 'ब्लॅक ब्रिफकेस' लघुपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. हा लघुपट त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज ठरणार आहे. मनीषच्या लघुपटाचा ट्रेलर पाहून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. 


'ब्लॅक ब्रिफकेस' लघुपटात मनीष आपल्या स्वभावाच्या विरुद्ध दिसतो आहे. नकारात्मक भूमिका साकारलेल्या मनीषच्या लघुपटाचा ट्रेलर पाहून अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, 'या प्रतिभावंत कलाकाराकडून अनपेक्षित नजराणा. माझ्या खूप शुभेच्छा.' 
मनीष पॉलने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली असून तो म्हणाला की, 'प्रत्येक अभिनेत्याला प्रत्येक भूमिका साकारत आली पाहिजे. एखाद्या पठडीत बांधलेल्या कलाकाराला हा बंध तोडणे कठीण असते. हा लघुपट केवळ १५ मिनिटांचा आहे. दरम्यान या चित्रपटातील काम करण्याचा अनुभव आव्हानात्मक आणि वेगळा होता. एक अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणे आपल्याला आवडत असून लोकांना फक्त मी शोचे निवेदन करतो आणि कॉमेडी करतो इतकंच माहीत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता माझ्यातला वेगळा मी दिसावा, इतकीच माझी अपेक्षा आहे.'
मनीषचा 'ब्लॅक ब्रिफकेस' लघुपट त्याच्या चाहत्यांना भावतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 

Web Title: Amitabh Bachchan wishes Manish Paul for his new short film