बॉलिवूडच्या महानायकलाही ट्रॅफिकचा कंटाळा, अनोळख्याकडून घेतली लिफ्ट; म्हणाले,"पिवळ्या शर्टवाला.."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 01:10 PM2023-05-15T13:10:26+5:302023-05-15T13:11:12+5:30

'प्रोजेक्ट के' सिनेमाच्या शूटसाठी जात असताना मुंबईतील ट्रॅफिकचा त्यांना कंटाळा आला.

amitabh bachchan took lift from stranger bored of mumbai traffic | बॉलिवूडच्या महानायकलाही ट्रॅफिकचा कंटाळा, अनोळख्याकडून घेतली लिफ्ट; म्हणाले,"पिवळ्या शर्टवाला.."

बॉलिवूडच्या महानायकलाही ट्रॅफिकचा कंटाळा, अनोळख्याकडून घेतली लिफ्ट; म्हणाले,"पिवळ्या शर्टवाला.."

googlenewsNext

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) सतत कामात व्यस्त असतात. कधी सिनेमा, कधी केबीसीच्या शूटिंगमध्ये ते व्यग्र असतात. 80 व्या वर्षी याही वयात त्यांनी इतकं काम करणं तरुणांनाही लाजवणारं  आहे. बिग बी सध्या 'प्रोजेक्ट के' सिनेमाचं चित्रीकरण करत आहेत. दरम्यान शूटला जाताना मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळून त्यांनी थेट अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली आहे. याचा फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय.

अमिताभ बच्चनसोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. सतत चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स देत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला. अनेक दिवस ते विश्रांती घेत होते. आता ते पुन्हा कामावर परतले आहेत. 'प्रोजेक्ट के' सिनेमाच्या शूटसाठी जात असताना मुंबईतील ट्रॅफिकचा त्यांना कंटाळा आला. मग काय एका अनोळखी दुचाकीस्वाराकडून त्यांनी लिफ्ट मागितली. बाईकवर मागे बसलेला असा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले,"राईडसाठी धन्यवाद मित्रा...तुला मी ओळखत नाही..पण तू म्हणालास आणि मला इच्छित स्थळी अगदी वेळेवर पोहोचवलेस...तेही वेगाने आणि कधीही न संपणाऱ्या या ट्रॅफिकमधून... टोपी, शॉर्ट्स आणि पिवळ्या टीशर्टवाल्याचे आभार."

अमिताभ बच्चन यांचं हे कॅप्शन चाहत्यांना खूपच आवडलंय. मात्र सोबतच चाहत्यांनी काळजीही व्यक्त केली आहे. दोघांनीही हेल्मेट घातलेले नसल्याची गोष्ट नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. दरम्यान अनेकांनी त्यांना 'कूल बिग बी' असंही संबोधलं आहे. त्यांचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय.

Web Title: amitabh bachchan took lift from stranger bored of mumbai traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.