फॅमिलीसोबत फोटो काढत होता धोनी, मागून बिग बी आले अन्...; अमिताभ बच्चन यांनी काय केलं पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:00 IST2025-06-02T12:59:35+5:302025-06-02T13:00:04+5:30
बिग बी आणि धोनीला एका कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या कृतीचं कौतुकही होत आहे.

फॅमिलीसोबत फोटो काढत होता धोनी, मागून बिग बी आले अन्...; अमिताभ बच्चन यांनी काय केलं पाहा
अमिताभ बच्चन हे बॉलिवूड आणि सिनेइंडस्ट्रीमधील दिग्गज आहेत. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटविश्वातील दिग्गज. अलिकडेच या दोन्ही दिग्गजांना एकाच कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या कृतीचं कौतुकही होत आहे.
अनेक कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटी कित्येक इव्हेंटमध्येही एकत्र दिसतात. अशाच एका कार्यक्रमाला महेंद्रसिंग धोनी त्याच्या कुटुंबीयांसोबत हजर होता. तर अमिताभ बच्चन यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ इन्स्टंट बॉलिवूडच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांच्यासोबत पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.
पापाराझी धोनीचे फोटो काढत असतानाच पाठीमागून बिग बी येत असल्याचं दिसत आहे. धोनीला फोटो काढत असल्याचं बघून अमिताभ बच्चन पाठीमागेच थांबत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत बिग बींचं कौतुक केलं आहे.