अमिताभ बच्चन म्हणतात 'ही' गोष्टी आहे आयुष्यातील सर्वात मोठं टॉर्चर, तुम्हीही व्हाल त्यांच्याशी सहमत.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:48 IST2020-12-19T14:46:30+5:302020-12-19T14:48:36+5:30
अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो मजेदार कॅप्शनसोबत शेअर केला आहे. या फोटोत ते एका हातात रसगुल्ला तर दुसऱ्या हातात गुलाब जामुन घेऊन आहेत.

अमिताभ बच्चन म्हणतात 'ही' गोष्टी आहे आयुष्यातील सर्वात मोठं टॉर्चर, तुम्हीही व्हाल त्यांच्याशी सहमत.....
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससाठी मजेदार पोस्ट शेअर करत असतात. कधी जुन्या आठवणी तर कधी व्हायरल व्हिडीओ शेअर करत असतात. रील आणि रिअल लाइफचे किस्से शेअर करत असतात. आपल्या कामाबाबत काही अपडेट्सही ते देतात. त्यांनी नुकताच एक फोटो मजेदार कॅप्शनसोबत शेअर केला आहे. या फोटोत ते एका हातात रसगुल्ला तर दुसऱ्या हातात गुलाब जामुन घेऊन आहेत.
बिग बी यांनी लिहिले की, जेव्हा आपण गोड खाणं सोडलेलं असतं तेव्हा शूटवर तुमच्या हातात रसगुल्ला आणि गुलाब जामुन देऊन सांगितलं जातं की, आत्ताच तुम्ही हे खाल्ल्यासारखं आणि स्वादिष्ट लागल्यासारखं एक्सप्रेशन द्यायचं आहे. यापेक्षा मोठं टॉर्चर लाइफमध्ये काहीही असू शकत नाही.
T 3757 - जब मीठा खाना छोड़ दिया तब shoot पे , हाथ में पकड़ा दिया rasgulla और gulab jamun और कहा ऐसा expression देना , की अभी अभी खा के बहुत स्वादिष्ट लगा है !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 18, 2020
इससे बड़ा torture life में नहीं हो सकता .... 😟😟😟😟😟 pic.twitter.com/p2lBn1MdBv
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ते अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहेत. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तसेच ते नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' आणि रूमी जाफरी यांच्या 'चेहरे' सिनेमातही दिसणार आहे.