भारत T 20 वर्ल्डकप जिंकावा म्हणून अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' मोठी गोष्ट; सोशल मीडियावर का होतंय बिग बींचं कौतुक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:14 IST2026-03-09T13:59:46+5:302026-03-09T15:14:11+5:30

भारताच्या विजयावर अमिताभ बच्चन यांची मजेशीर पोस्ट, म्हणाले...

Amitabh Bachchan Ritual India T20 World Cup Win Viral Post Fans Reaction Superstition | भारत T 20 वर्ल्डकप जिंकावा म्हणून अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' मोठी गोष्ट; सोशल मीडियावर का होतंय बिग बींचं कौतुक?

भारत T 20 वर्ल्डकप जिंकावा म्हणून अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' मोठी गोष्ट; सोशल मीडियावर का होतंय बिग बींचं कौतुक?

Amitabh Bachchan T20 World Cup : क्रिकेटची मॅच लागल्यावर टीव्हीसमोरुन न हलणाऱ्यांपासून ते अगदी आपली आवडती टीम जिंकावी यासाठी देव पाण्यात ठेवणाऱ्यांपर्यंतचे अस्सल चाहत्यांचे प्रकार पाहायला मिळतात. बच्चन कुटुंबसुद्धा असेच क्रिकेट प्रेमी आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना तर प्रचंड क्रिकेट आवडतं. पण, काल (८ मार्च २०२६) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना अमिताभ यांनी पाहिला नाही. याचा खुलासा अमिताभ यांनी स्वत:च केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी इंडियाची मॅच बघितली की तेव्हा टीम हरतेच. असे अनेकदा घडले आहे.  याच भीतीपोटी त्यांनी न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना न पाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. भारताच्या विजयानंतर त्यांनी सोशल मीडियावर 'T-5679' ही पोस्ट शेअर करत लिहिलं, "मी म्हटलं होतं की, मी सामना पाहिला नाही तर आपण जिंकू... आणि तेच घडलं!".

"पुढील १० वर्षे टीव्ही बंदच ठेवा"
अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिलं, "अमित जी, तुम्ही सामना पाहिला नाही हे खरंच चांगलं झालं, अन्यथा भारत हरला असता. तुमचं हे 'बलिदान' देशासाठी महत्त्वाचं आहे". तर दुसऱ्या एकाने विनोदाने सल्ला दिला की, "सर, जर हे असंच असेल तर पुढील १० वर्षे तुमचा टीव्ही बंदच ठेवा, म्हणजे भारत प्रत्येक ट्रॉफी जिंकेल". काही चाहत्यांनी मात्र बिग बींना हा सामना उघडपणे पाहण्याचा आग्रह केला आणि म्हटलं की, "तुम्ही पाहिलं असतं तरी आमचा संघ इतका मजबूत आहे की आपणच जिंकलो असतो". 

अमिताभ बच्चन हे सध्या वयाची ८० ओलांडल्यानंतरही प्रचंड सक्रिय आहेत. लवकरच ते 'कल्की २८९८ एडी भाग २', 'ब्रह्मास्त्र २', 'आंखे २' आणि 'सेक्शन ८४' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title : बिग बी का अंधविश्वास: उनके न देखने से भारत टी20 विश्व कप जीता।

Web Summary : अमिताभ बच्चन ने मजाक में भारत की टी20 विश्व कप जीत का श्रेय अपने अंधविश्वास को दिया। उन्होंने न्यूजीलैंड के खिलाफ फाइनल मैच देखने से परहेज किया, क्योंकि उनका मानना है कि उनकी उपस्थिति टीम के लिए अशुभ है। प्रशंसकों ने मजाक में सुझाव दिया कि वह भविष्य के टूर्नामेंटों के लिए अपना टीवी बंद रखें।

Web Title : Big B's superstition: India won T20 World Cup because he didn't watch.

Web Summary : Amitabh Bachchan jokingly credits India's T20 World Cup victory to his superstition. He avoided watching the final match against New Zealand, believing his presence jinxes the team. Fans humorously suggested he keeps his TV off for future tournaments.