"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:10 IST2025-06-24T12:10:03+5:302025-06-24T12:10:48+5:30

एकाने बिग बींना "म्हाताऱ्याला वेड लागलंय"(बुड्ढा सठिया गया) असं म्हटलं. चाहत्याची कमेंट पाहून बिग बी भडकले आहेत.

amitabh bachchan reply to fan who called him old man gone crazy | "म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."

"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ते नेहमीच काही ना काहीतरी ट्वीट करत असतात. अनेकदा त्यांचे ट्वीट हा चर्चेचा विषय असतो. पण, सध्या मात्र अमिताभ बच्चन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या ट्वीटच्या काही कमेंटमध्ये चाहत्यांना रिप्लाय केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

अमिताभ यांना चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली आहेत. एकाने बिग बींना "म्हाताऱ्याला वेड लागलंय"(बुड्ढा सठिया गया) असं म्हटलं. चाहत्याची कमेंट पाहून बिग बी भडकले आहेत. त्यांनी रिप्लाय देत म्हटलंय की "एक दिवस तुम्ही देखील म्हातारे व्हाल, देव न करो तो दिवस लवकर येवो. पण, आपल्याकडे एक म्हण आहे- जो साठा, वो पाठा". (एक दिन, भगवान न करे वो जल्दी आय, आप भी सठिया जाएँगे, परंतु हमारे यहाँ एक कहावत है- जो साठा, वो पाठा) 

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर करत त्याचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट शेअर केली होती.  अमिताभ यांच्या पोस्टवरही चाहत्याने "तुम्ही फक्त अभिषेकची प्रशंसा करतो. सून आणि बायकोची का करत नाही", असं विचारलं होतं. त्या चाहत्याला अमिताभ यांनी उत्तर दिलं होतं. "मी त्यांचं कौतुक मनात करतो. पब्लिकली नाही. मी महिलांचा आदर करतो", असं त्यांनी म्हटलं होतं. 

Web Title: amitabh bachchan reply to fan who called him old man gone crazy