Goodbye Trailer : क्षणात हसवतो, क्षणात रडवतो...! पाहा अमिताभ-रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:23 IST2022-09-06T14:22:44+5:302022-09-06T14:23:56+5:30
Goodbye Trailer : ‘गुडबाय’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ट्रेलरमधील अमिताभ व रश्मिका यांच्यातील ‘तू तू मैं मैं’ बघण्यासारखी आहे.

Goodbye Trailer : क्षणात हसवतो, क्षणात रडवतो...! पाहा अमिताभ-रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर
Goodbye Trailer : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे एकापोठ एक असे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. याशिवाय ‘गुडबाय’ (Goodbye) हा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 7 ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अमिताभ व साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा एक फॅमिली ड्रामा आहे. या चित्रपटातून रश्मिका मंदानाचाबॉलिवूड डेब्यू होतोय.
सध्या ‘गुडबाय’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या ट्रेलरमध्ये इमोशन्स आहेत, कॉमेडी आहे, ड्रामा असं सगळं आहे. ट्रेलरमधील अमिताभ व रश्मिका यांच्यातील ‘तू तू मैं मैं’ बघण्यासारखी आहे.
नीना गुप्ता व अमिताभ यांचे सीन्सही जबरदस्त आहेत. सुनील ग्रोव्हर हाही चित्रपटात आहे. चित्रपटातील सरप्राईज पॅकेज असंही त्याला म्हणता येईल. साऊथ सेन्सेशन रश्मिका मंदानाची तर बातचं न्यारी. ती एकदम जमून आली आहे. हा ट्रेलर तुम्हाला क्षणात हसवतो, क्षणात रडवतो.
‘गुडबाय’ हा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असेल. या चित्रपटात रश्मिका बिग बींच्या मुलीची भूमिका साकारत आहे. याशिवाय नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात दिसणार आहेत.