अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:59 IST2025-07-08T12:59:26+5:302025-07-08T12:59:57+5:30
अमिताभ बच्चन यांनी इंग्लंडविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवल्यावर पोस्ट लिहिली. परंतु यानंतर बिग बींना ट्रोल व्हावं लागलं. काय आहे यामागचं कारण?

अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण...
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सर्वांना आनंद झालाय. अनेक दिवसांनी टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये हा विजय मिळवलाय. त्यामुळे सर्वांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीम इडियाला शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनी या शुभेच्छा विजयाच्या ४८ तासांनी उशिरा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. काय घडलं बघा.
अमिताभ का झाले ट्रोल?
भारतानेइंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच एजबॅस्टन मैदानावर टेस्ट सामना जिंकला. यानंतर संपूर्ण देशभरात टीम इंडियाचं जोरदार कौतुक सुरू होतं. अनेक दिग्गज कलाकार आणि क्रिकेटप्रेमींनी लगेचच टीमला बधाई दिली. अमिताभ बच्चन यांनी मात्र दोन दिवसांनी ट्वीट करत लिहिलं, "T 5029 – ठोक दिया… क्रिकेट में!!" त्यांच्या या ट्विटवर काहींनी आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी अमिताभ यांनी उशीरा पोस्ट केल्यामुळे त्यांना ट्रोल केलं.
T 5435 - ठोक दिया - किरकिट में
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 7, 2025
नेटकऱ्यांपैकी काहींनी म्हटलं, “सर, आज जरा उशीरच झाला का?”, “काल जिंकलो, आज सांगताय?”, “आपला साबण स्लो आहे का?”, अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी बिग बींना दिली. दरम्यान, काही चाहत्यांनी मात्र बिग बींचं समर्थन करत सांगितलं की, अमिताभ बच्चन हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत आणि वेळ मिळाल्यावरच त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. भारताने इंग्लंडविरुद्ध जो विजय मिळवला तो ऐतिहासिक ठरला. शुबमन गिलच्या कॅप्टनसीअंतर्गत ही कामगिरी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. भारत आता पुढील सामन्यांमध्ये कशी कामगिरी करेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.