अमृताला लागली बॉलीवुडची लॉटरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 14:47 IST2016-06-25T09:17:40+5:302016-06-25T14:47:40+5:30

मराठी रंगभूमी, मराठी सिनेमा, छोटा पडदा गाजवल्यानंतर तिनं बॉलीवुडमध्येही यशस्वी एंट्री केलीय. ही अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष.तिच्या ...

Amitabh Bachchan looters! | अमृताला लागली बॉलीवुडची लॉटरी !

अमृताला लागली बॉलीवुडची लॉटरी !

ाठी रंगभूमी, मराठी सिनेमा, छोटा पडदा गाजवल्यानंतर तिनं बॉलीवुडमध्येही यशस्वी एंट्री केलीय. ही अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष.तिच्या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या अभिनयावर आता बॉलीवुडही फिदा झालंय. त्यामुळं तिला बॉलीवुडच्या सिनेमांची लॉटरीच लागलीय..

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि सत्यदेव दुबेंची विद्यार्थिनी असलेल्या अमृतानं आजवर अनेक भूमिका गाजवल्या. ‘ती फुलराणी’ असो किंवा देवराई, गंध, श्वास, वळू, विहीर किल्ला यासारख्या मराठी सिनेमातील भूमिका.अमृतानं दरवेळी रसिकांची वाहवा मिळवली. त्यामुळंच अमृताच्या 'रमन राघव 2.0'  या बॉलीवुडच्या सिनेमाकडं रसिकांच्या नजरा लागल्या होत्या. या सिनेमात अमृताची छोटीशी भूमिका असली तरी त्याला तिनं पूर्ण न्याय दिलाय.याच छोट्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेमुळं अमृताची बॉलीवुडमध्येही जोरदार चर्चा सुरु झालीय.

'रमन राघव 2.0' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीची भूमिका तिनं साकारली होती. याच कसदार आणि दमदार भूमिकेमुळं अमृतानं अवघ्या बॉलीवुडचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. आगामी काही दिवसांत अमृताचे तीन  हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येतायेत.आगामी काळात बड्या बड्या दिग्दर्शकांसोबत अमृता काम करणार आहे. तिच्या आगामी सिनेमांमध्ये 'आयर्लंड सिटी', 'चिड़ीयाँ' आणि 'अल्बर्ट आइस्टाइन बनना चाहता हुँ', या सिनेमांचा समावेश आहे. 'रमन राघव 2.0' या सिनेमात अमृताच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली असली तरी आगामी सिनेमांमध्ये तिला चांगल्या चांगल्या भूमिका ऑफर झाल्यात. यांत अमृता सिनेमातील प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. या बॉलीवुडच्या आगामी सिनेमात अमृता नायिकाची नायिका साकारताना पाहायला मिळेल.

आता रमन राघव 2.0 या सिनेमानंतर अमृताच्या आगामी बॉलीवुड सिनेमांची रसिकांना उत्सुकता नक्कीच लागली असणार. अमृतानं आजवर ज्यारितीनं नाटक, मराठी सिनेमा, छोटा पडदा गाजवला. त्याचप्रमाणे आगामी काळात हिंदी सिनेमांमध्ये आपल्या यशाचा झेंडा रोवत बॉलीवुडमध्ये अढळ स्थान निर्माण करावं हीच तिच्या फॅन्सची इच्छा आहे.

- Suvarna.jain@lokmat.com

Web Title: Amitabh Bachchan looters!