कृपा कृपा कृपा...! अमिताभ बच्चन यांनी चक्क लिंबू मिरची लावून काढली 2021 ची दृष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 15:01 IST2020-12-15T15:01:23+5:302020-12-15T15:01:52+5:30

2020 या वर्षाने अनेक धक्के पचवले. अगदी कोरोनाच्या संकटापासून तर अनेक दिग्गजांच्या निधनापर्यंत या वर्षाने सर्वांची अक्षरश: सत्त्वपरीक्षा घेतली.

amitabh bachchan hopes happy new year in 2021 shares this message | कृपा कृपा कृपा...! अमिताभ बच्चन यांनी चक्क लिंबू मिरची लावून काढली 2021 ची दृष्ट

कृपा कृपा कृपा...! अमिताभ बच्चन यांनी चक्क लिंबू मिरची लावून काढली 2021 ची दृष्ट

ठळक मुद्दे2021 या वर्षात अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली होती. केवळ तेच नाही तर त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन हे तिघेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.

2020 या वर्षाने अनेक धक्के पचवले. अगदी कोरोनाच्या संकटापासून तर अनेक दिग्गजांच्या निधनापर्यंत या वर्षाने सर्वांची अक्षरश: सत्त्वपरीक्षा घेतली. कोरोना सावट, लॉकडाऊन, यामुळे ठप्प झालेले रोजगार इतके कमी की काय म्हणून अवकाळी पाऊस आणि पूर असे काय काय या वर्षाने आपल्याला दाखवले.  बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार या वर्षाने आपल्यापासून हिरावून घेतले. सुशांत सिंग राजपूत, इरफान खान, ऋषी कपूर यासारख्या बॉलिवूडच्या काही दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला. एकंदर काय तर या वर्षात लहान-थोर, गरिब-श्रीमंत सगळ्यांनीच आजुबाजूची निराशा अनुभवली. साहजिकच 2020 सारखे वर्ष पुन्हा येऊ नये, अशीच सर्वांची इच्छा आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेही त्याला अपवाद नाहीत. नवीन वर्षाची पहिली पहाट उगवायला अद्याप काही दिवसांचा अवकाश आहे. मात्र अमिताभ यांनी त्यापूर्वीच नूतन वर्षाची दृष्ट काढली आहे.

 येऊ घातलेल्या 2021 या वर्षावरचे काही मीम्स सोशल  मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक मीम  अमिताभ बच्चन यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. या मीममध्ये 2021 असे लिहीलेला एक फोटो  आहे. त्यात खाली लिंबू आणि मिरची लटकलेली दिसत आहे. ‘कृपा कृपा कृपा...’ या कॅप्शनसह बिग बींनी हा फोटो शेअर केला आहे.
2021 या वर्षात अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली होती. केवळ तेच नाही तर त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन हे तिघेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. या सर्वांना उपचारासाठी नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
 

Web Title: amitabh bachchan hopes happy new year in 2021 shares this message