अमिताभ बच्चन यांच्या नातीचं हिंदी ऐकलंत का? नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांची देशाला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 04:00 PM2023-06-20T16:00:37+5:302023-06-20T16:01:42+5:30

इतक्या कमी वयात श्वेताने स्वत: स्टार्टअप सुरु केले असून ती यामाध्यमातून सामाजिक विषयांवर काम करते.

amitabh bachchan granddaughter navya naveli nanda speaks fluent hindi fans impressed | अमिताभ बच्चन यांच्या नातीचं हिंदी ऐकलंत का? नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांची देशाला...'

अमिताभ बच्चन यांच्या नातीचं हिंदी ऐकलंत का? नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांची देशाला...'

googlenewsNext

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda)  इतर स्टारकिड्स पेक्षा कायमच वेगळी ठरते. तिचा साधेपणा आणि समाजसेवेसाठी ती घेत असलेला पुढाकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. इतक्या कमी वयात श्वेताने स्वत: स्टार्टअप सुरु केले असून ती यामाध्यमातून महिला सबलीकरण, शिक्षण या विषयांवर काम करते. नव्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत नव्या म्हणाली की तिला सध्या अभिनयात करिअर करण्याची इच्छा नाही. भविष्यातील योजनांबाबत सांगताना ती म्हणाली, 'एक गोष्ट सतत मी ऐकते की तुझं वय खूप कमी आहे तुझ्याकडे अनुभव नाही. मग तुम्ही कसं या सर्व गोष्टींमध्ये पुढाकार घेत काम करता? तुम्हाला वैद्यकीय गोष्टी, कायदेविषयक जनजागृती आणि कौटुंबिक हिंसाचार याबाबत माहिती आहे. मला वाटतं जर मी काही संपादन करायला वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत थांबू तर या जगाचं काय होईल? आजच्या पिढीचं काय होईल? नवीन पिढी खूप हुशार आहे आणि देशात ८० टक्के लोक आमच्याच वयोगटातील आहेत.'

नव्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी प्रभावित झाले आहेत. 'हिच्यापेक्षा हुशार स्टारकिड पाहिला नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. नव्याच्या विचारावर चाहते इंप्रेस झालेत. नव्या खूप हुशार आहे. या वयात इतक्या समजुतीने आपलं म्हणणं मांडणं तिच्यावर झालेले संस्कारच दर्शवतं. 

नव्या अनेक ठिकाणी फिरते, वेगवेगळ्या शहरात अगदी रस्त्यारस्त्यावर फिरत ती गोष्टी जाणून घेते. इतर स्टारकिड्सच्या तुलनेत ती खूपच समजदार वाटते. सध्या नव्या आणि 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. दोघांना आधी गोवावरुन आल्यानंतर विमानतळावर आणि नंतर मूव्ही डेटवर पाहिले गेले होते.

Web Title: amitabh bachchan granddaughter navya naveli nanda speaks fluent hindi fans impressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.