उगाच घुमवून फिरवून का बोलता; थेट काय ते सांगा ना...! ट्वीट करताच अमिताभ बच्चन झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:49 PM2021-02-04T15:49:34+5:302021-02-04T15:49:53+5:30

वाचा, काय आहे कारण

amitabh bachchan gets trolled for sharing a cryptic post on social media |  उगाच घुमवून फिरवून का बोलता; थेट काय ते सांगा ना...! ट्वीट करताच अमिताभ बच्चन झाले ट्रोल

 उगाच घुमवून फिरवून का बोलता; थेट काय ते सांगा ना...! ट्वीट करताच अमिताभ बच्चन झाले ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवरून केला होता. तिच्या या ट्विटनंतर  आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु झाली.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहाना, मिया खलिफा, मीना हॅरीस, ग्रेटा थनबर्ग अशा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी टिष्ट्वट केल्यानंतर हे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या आंदोलनाची चर्चा सुरु झाल्यानंतर अक्षय कुमार, अजय देवगण, कंगना राणौत, सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर अशा अनेक दिग्गजांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्वीट करत, शेतकरी व त्यांचे आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले. यादरम्यान बॉलिवूडचे महानायक यांनीही एक ट्वीट केले आणि त्यांचे हे ट्वीट पाहून युजर्सनी त्यांना ट्रोल करणे सुरु केले.

शेतकरी आंदोलन वा त्यावरच्या आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यावर अमिताभ यांनी थेटपणे काहीही लिहिले नाही. पण तरिही ते ट्रोल झालेत.

‘तर्क का जवाब तो तर्क में दिया जा सकता है
पर विश्वास का जवाब तर्क के पास नहीं है’, असे ट्वीट त्यांनी केले. त्यांचे हे ट्वीट पाहून लोकांनी त्यांना गोलमटोल ट्वीट न करता थेट काय ते बोलण्याचा सल्ला दिला.

हे असले गर्भित ट्वीट काय करता? शेतकरी आंदोलनावर कोणाच्या बाजूने आहात, ते स्पष्ट स्पष्ट सांगा, असे लोकांनी त्यांना सुनावले.

आता तर   बोला. तुम्हाला फक्त देशाला सपोर्ट करायचा आहे. ते न करता बळजबरीचे ज्ञान क्त्त वाटता, असेही एका युजरने त्यांना सुनावले. काहींनी तर यावरचे मीम्सही व्हायरल केलेत.

बॉलिवूडने रिहानाला फटकारले 
शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल पॉप सिंगर रिहानाने ट्विटरवरून केला होता. तिच्या या ट्विटनंतर  आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले.  आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी  पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला. रिहानाच्या या ट्वीटवर भारतात वेगवेगळ्या स्तरातून  प्रतिक्रिया दिल्या. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. रिहानाच्या जगभर चर्चेत आलेल्या ट्वीटवर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झालेत. अक्षय कुमारपासून करण जोहर, अजय देवगण, सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी सरकारचे समर्थन करत, रिहानाला अप्रत्यक्षपणे फटकारले. 

Web Title: amitabh bachchan gets trolled for sharing a cryptic post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.