रणबीर कपूरच्या 'रामायणा'त बिग बींची एन्ट्री, अमिताभ साकारणार ही महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:47 AM2024-02-12T10:47:34+5:302024-02-12T10:49:13+5:30

नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला रामायण सिनेमात आता अमिताभ बच्चन झळकणार असल्याची चर्चा आहे

amitabh bachchan entry in Ranbir Kapoor's 'Ramayana', Amitabh will play a major role dashrath | रणबीर कपूरच्या 'रामायणा'त बिग बींची एन्ट्री, अमिताभ साकारणार ही महत्वाची भूमिका

रणबीर कपूरच्या 'रामायणा'त बिग बींची एन्ट्री, अमिताभ साकारणार ही महत्वाची भूमिका

नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरच्या 'रामायण' (Ramayana) सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. सध्या सिनेमाचं कास्टिंग जोरात सुरु आहे. रामायणातील विविध भूमिकांसाठी लोकप्रिय अभिनेत्यांना सिनेमात कास्ट केलं जातंय. सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेची भूमिका साकारणार आहे. आता 'रामायण' सिनेमात भारतीय सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एन्ट्री झालीय. अमिताभ रामायणात कोणती भूमिका साकारणार?

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन 'रामायण' सिनेमात दशरथाची भूमिका साकारणार आहेत. सिनेमाची टीम अमिताभ यांना रामायणात कास्ट करण्यासाठी उत्सुक आहेत. याआधीही अमिताभ यांना 'द लेजेंड ऑफ रामा' या सिनेमासाठी दशरथाची भूमिका ऑफर झाली होती. दरम्यान 'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन काम करणार की नाही हे, अद्याप निश्चित नसलं तरीही लोकांना त्यांना दशरथाच्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल यात शंका नाही. 

'रामायण' सिनेमाच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर... सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश दिसणार आहे. तर कुंभकर्णाच्या भूमिकेत लॉर्ड बॉबी देओल झळकणार आहे. लारा दत्ता कैकेयी तर विजय सेतुपती बिभिषणाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'रामायण' सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असून हा सिनेमा पुढील वर्षी २०२५ ला भेटीला येण्याची शक्यता आहे.

Web Title: amitabh bachchan entry in Ranbir Kapoor's 'Ramayana', Amitabh will play a major role dashrath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.