शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलला होता राष्ट्रपती भवनातील जुना नियम; काय आहे तो किस्सा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:50 PM2024-02-06T13:50:15+5:302024-02-06T13:53:03+5:30

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेलं अभिनय करिअर सोडून बच्चन राजकारणात उतरले होते.

Amitabh Bachchan Changed the Old Rule of Rashtrapati Bhawan | शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलला होता राष्ट्रपती भवनातील जुना नियम; काय आहे तो किस्सा?

शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलला होता राष्ट्रपती भवनातील जुना नियम; काय आहे हा किस्सा?

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. अमिताभ बच्चन गेली अनेक वर्षे आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. गेल्या पाच दशकांपासून त्यांचा चाहता वर्ग वाढतोच आहे. तर आज आपण त्यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा जाणून घेणार आहोत. 

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेलं अभिनय करिअर सोडून बच्चन राजकारणात उतरले होते.  राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली.  उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री हेमवंती नंदन बहुगुणा यांचा पराभव करत त्यांनी निवडणूक जिंकली. राजकारणात तो भलेही जास्त काळ राहिले नाही. पण, दीर्घकाळापासून चालत आलेला राष्ट्रपती भवनचा एक नियम अमिताभ यांनी बदलायला लावला होता.

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना एकदा राष्ट्रपती भवनात डिनरसाठी बोलावण्यात आले होते. तिथं पोहोचताच डायनिंग टेबलवर ताटं बघून त्याला आश्चर्य वाटलं. कारण त्यावर अशोक स्तंभाचे चिन्ह होतं. ते अशोक स्तंभाचं चिन्ह अमिताभ बच्चनला आवडलं नाही आणि त्यांना हा देशाचा आणि अशोक स्तंभाचा अपमान वाटला. यावर महत्वाचं पाऊल उचलत त्यांनी जेवणाच्या थाळीवरून राष्ट्रीय प्रतिक असलेली चिन्हे हटवण्यात यावी अशी मागणी केली.  त्यानंतर संसदेत ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यावरून अशोक स्तंभाचे चिन्ह काढून टाकण्यात आले.

अमिताभ बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तर ते शेवटचे 'गणपत' चित्रपटात दिसले होते. लवकरच ते कमल हासन, प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. ती रजनीकांतसोबत ''थलाइवर 170'' या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून 32 वर्षांनी  अमिताभ आणि रजनीकांतची जोडी एकत्र येणार आहे. 2024 मध्ये हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Web Title: Amitabh Bachchan Changed the Old Rule of Rashtrapati Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.