अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाआधी घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, जाणून घ्या यामागचे कारण
By गीतांजली | Updated: October 10, 2020 15:13 IST2020-10-10T15:11:35+5:302020-10-10T15:13:46+5:30
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या आपला 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाआधी घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, जाणून घ्या यामागचे कारण
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या आपला 78 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हजारो फॅन्स त्यांच्या घराबाहेर जमतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासन् तास घराबाहेर वाट बघत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही बिग बींच्या घराबाहेर चाहते जमू शकतात असा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसा बाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण राज्यात खास करुन मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रकोप आहे. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांनी सोशल डिस्टेंसिंग राखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार यावर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केल्याची माहिती आहे. म्हणजेच11 ऑक्टोबर रोजी जलसाच्या सभोवताली मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित असतील.
काही महिन्यांपूर्वी कोरोनावर मात करुन अमिताभ बच्चन परतले आहेत. अशा परिस्थितीत बिग बीदेखील त्यांचा वाढदिवशी धुमधडाक्यात साजरा करणार नाहीत. सध्या बिग बी 'कौन बनेगा करोडपती 12'शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ते सतत शूटींग करत आहेत आणि आपल्या कामाला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. अलिकडेच त्यांनी खुलासा केला होता की, ते रोज 12 ते 15 तास शूटिंग करतायेत.