अमिताभ बच्चन व आमीर खान 'ह्या' सिनेमात दिसणार ठुमके लगावताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 14:51 IST2018-10-15T14:50:24+5:302018-10-15T14:51:35+5:30

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे निर्माते या सिनेमात प्रेक्षकांसाठी एक दमदार गाणे घेऊन येत आहेत. या गाण्यावर अमिताभ बच्चन व आमीर खाम नशेत थिरकताना दिसणार आहेत.

Amitabh Bachchan and Aamir Khan will be dancing in this movie | अमिताभ बच्चन व आमीर खान 'ह्या' सिनेमात दिसणार ठुमके लगावताना

अमिताभ बच्चन व आमीर खान 'ह्या' सिनेमात दिसणार ठुमके लगावताना

ठळक मुद्दे'वशमले...' या गाण्यावर थिरकताना दिसणार अमिताभ बच्चन व आमीर खान'ठग्स ऑफ हिंदोस्तान' ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाचा टीझर व पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओलादेखील रसिकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाचे निर्माते या चित्रपटात प्रेक्षकांसाठी एक दमदार गाणे घेऊन येणार आहेत. या गाण्यात नशेमध्ये अमिताभ बच्चन व आमीर खान ठुमके लगावताना दिसणार आहेत.


अमिताभ बच्चन व आमीर खान 'वशमले...' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. 'वशमले'चा अर्थ मनसोक्त नाचणे असा आहे. या गाण्याची कोरियोग्राफी प्रभूदेवाने केली आहे. पहिल्यांदाच आमीर व अमिताभ बच्चन एकत्र डान्स करताना दिसणार आहे. हे गाणे स्पेशल बनवण्यासाठी प्रभुदेवाने अजिबात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. या गाण्याला सुखविंदर सिंग व विशाल दादलानीने स्वरसाज दिला आहे आणि अजय-अतुलने संगीत दिले आहे. या गाण्याबद्दल दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य म्हणाले की, अमिताभ बच्चन व आमीर खान यांना एकत्र डान्स करताना पाहणे कमालीचे ठरणार आहेत. हे गाणे सिनेमात महत्त्वपूर्ण आहे आणि हे गाणे रसिकांना नक्कीच भावेल.
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमीर खान व अमिताभ बच्चन यांना एकत्र रुपेरी पडद्यावर थिरकताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 
 

Web Title: Amitabh Bachchan and Aamir Khan will be dancing in this movie