अमिषा पटेल पुन्हा युजर्सच्या रडारवर; आता ‘या’ फोटोवरून धरले धारेवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 18:17 IST2018-04-28T12:47:21+5:302018-04-28T18:17:28+5:30

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा युजर्सच्या रडारवर आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोला युजर्सनी अतिशय विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या.

Amisha Patel again on the users' radar; Now the 'this' photo caught Dharevara! | अमिषा पटेल पुन्हा युजर्सच्या रडारवर; आता ‘या’ फोटोवरून धरले धारेवर!

अमिषा पटेल पुन्हा युजर्सच्या रडारवर; आता ‘या’ फोटोवरून धरले धारेवर!

िनेत्री अमिषा पटेल पडद्यावरून जरी गायब असली तरी, सोशल मीडियावर ती जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती नियमितपणे तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. मात्र यामुळे बºयाचदा ती युसर्जच्या निशाण्यावरही आली आहे. खरं तर अमिषा खूपच स्टायलिश आहे. त्यामुळे ती प्रत्येक नवा ट्रेंड ट्राय करीत असते. कपड्यांविषयीदेखील ती खूपच चुजी आहे. ज्यामुळे ती इतर अभिनेत्रींच्या तुलनेत काहीशी वेगळी स्टाइल ट्राय करीत असते. यावेळेस तिने अशीच काहीशी वेगळी स्टाइल ट्राय करताना तिचे काही फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले. ज्यामुळे युजर्सनी पुन्हा एकदा तिला ट्रोल्स करण्यास सुरुवात केली. 

अमिषाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर जीन्स टॉप घातलेला एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये तिने ट्रेण्डी लूकवाली निळ्या रंगाची जीन्स घातली. त्यावर लाल रंगाचा टॉपही घातला. मात्र अमिषाचा हा फोटो बघून युजर्सचा चांगलाच संताप झाला. तिच्या या फोटोला युजर्सकडून अतिशय विचित्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘परिधान करण्यासाठी तुझ्याकडे कपडे नाहीत काय?’ दुसºया युजरने लिहिले, ‘पोछा कपडा घालून आलीस काय?’
 

आणखी एका युजरने लिहिले, ‘तुला फोटो काढण्याचा सेन्स नाही काय?’ दरम्यान, या सर्व नकारात्मक प्रतिक्रिया येत असताना अमिषाच्या काही चाहत्यांनी तिचे समर्थनही केले. अनेकांनी तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले. तर बºयाचशा युजर्सनी फोटोमध्ये तू खूपच सुंदर आणि हॉट दिसत असल्याचे म्हटले. खरं तर पहिल्यांदाच अमिषाच्या फोटोला अशाप्रकारच्या प्रतिक्रिया आल्यात असे नाही. तर यापूर्वीदेखील तिला तिच्या फोटोवरून ट्रोल करण्यात आले आहे. दरम्यान, अमिषा मोठ्या पडद्यावर केव्हा कमबॅक करणार याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

Web Title: Amisha Patel again on the users' radar; Now the 'this' photo caught Dharevara!