Prabhas : आजारपण की आणखी काही? साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान प्रभास दीर्घ सुट्टीवर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:02 IST2023-02-09T18:01:31+5:302023-02-09T18:02:03+5:30

Prabhas : होय, प्रभास व क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

Amidst News Of Engagement With Kriti Sanon Prabhas Took A Long Break From Work | Prabhas : आजारपण की आणखी काही? साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान प्रभास दीर्घ सुट्टीवर!!

Prabhas : आजारपण की आणखी काही? साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान प्रभास दीर्घ सुट्टीवर!!

साऊथचा सुपरस्टार प्रभास ( Prabhas) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कारण आहे, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन  (Kriti Sanon). होय, प्रभास व क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. प्रभास व क्रिती डेस्टिनेशन एन्गेजमेंट करणार असल्याचा दावा केला जात आहे. मालदीवमध्ये प्रभास व क्रिती यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा जोरात आहेत. विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास आणि क्रितीच्या साखरपुड्याबाबत एक ट्विट केलं आणि ही चर्चा सुरू झाली. अशात आता प्रभासबद्दलची एक ताजी बातमीही कानावर येतेय.

होय, प्रभास सध्या दीर्घ सुट्टीवर असल्याचं कळतंय. आपल्या आगामी सिनेमांचं शूटींगही त्याने म्हणे रद्द केलं आहे. अर्थात प्रभास आजारी असल्याचं म्हटलं जात आहे.
रिपोर्टनुसार, प्रभास गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्याला ताप आहे. डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, प्रभासने विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सोशल मीडियावर याचीही चर्चा सुरू झाली आहे. साखरपुड्याच्या बातम्या आणि प्रभासची आजारपणाची सुट्टी हा योगायोग कसा असू शकतो?असा सवाल विचारला जातोय. आता खरं काय ते प्रभासलाच ठाऊक!

 प्रभास आणि क्रितीच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून क्रिती आणि प्रभास हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दोघांपैकी कोणीच आपले नात सर्वांसमोर स्वीकारलेलं नाहीये. आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरून यांच्या लव्ह स्टोरीला (Love story) सुरूवात झाल्याचं मानलं जात आहे.

Web Title: Amidst News Of Engagement With Kriti Sanon Prabhas Took A Long Break From Work