मासिकावर प्रियंका चोप्राचा फोटो पाहून संतापली अमेरिकन महिला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 10:44 IST2019-09-01T10:42:38+5:302019-09-01T10:44:19+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करून ग्लोबल स्टार झालेली प्रियंका चोप्रा कायम चर्चेत असते. लग्नानंतर दरदिवशी पती निक जोनाससोबतचे तिचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे.

american woman insults priyanka chopra to threw her cover page magazine | मासिकावर प्रियंका चोप्राचा फोटो पाहून संतापली अमेरिकन महिला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

मासिकावर प्रियंका चोप्राचा फोटो पाहून संतापली अमेरिकन महिला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रियंकाने अमेरिकन चाहते हे भारतीय चाहत्यांपेक्षा अधिक सभ्य असतात, असे विधान केले होते.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करून ग्लोबल स्टार झालेली प्रियंका चोप्रा कायम चर्चेत असते. लग्नानंतर दरदिवशी पती निक जोनाससोबतचे तिचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, एका अमेरिकन महिलेला प्रियंकावरचा राग इतका अनावर झाला की, तिने प्रियंकाचा फोटो असलेले मासिक चक्क केराच्या टोपलीत फेकले.
होय, सोशल मीडियावर सध्या प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिस धालीवाल नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला एक मासिक कचºयाच्या डब्यात फेकताना दिसत आहे. या मासिकावर प्रियंका चोप्राचा फोटो आहे. 




‘हे मासिक मला माझ्या घराच्या जवळ सापडले. रिसायकलिंग न करता मी ते कच-याच्या डब्यात   फेकले तर ते अधिक योग्य ठरेल,असे मला वाटले,’ असे ही महिला व्हिडीओ म्हणतेय. प्रियंकाचा फोटो असलेले मासिक कच-याच्या डब्यात फेकतानाचा व्हिडीओ तिने तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.




अमेरिकन लोकांकडून प्रियंका अनेकदा ट्रोल झालीय. अनेकदा तिला अपमान सहन करावा लागला आहे. प्रियंका व निकच्या लग्नानंतर एका अमेरिकन मासिकाने प्रियंकाने निकवर लग्नासाठी दबाव टाकल्याचे म्हटले होते. प्रियंका व निक हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त अन्य एका मासिकाने प्रसिद्ध केले होते.  मात्र दोन्ही वेळी निकच्या कुटुंबीयांनी या सर्व अफवा असल्याचे सांगत ही वृत्त फेटाळली होती. तसेच याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.




काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रियंकाने अमेरिकन चाहते हे भारतीय चाहत्यांपेक्षा अधिक सभ्य असतात, असे विधान केले होते. यावरून तिचे भारतीय चाहते नाराज झाले होते. पण आता अमेरिकन चाहत्यांकडूनच प्रियंका लक्ष्य होताना दिसतेय.

Web Title: american woman insults priyanka chopra to threw her cover page magazine