काय सांगता? नागार्जुनच्या फॅमिलीत धुसफूस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 15:04 IST2020-04-12T15:02:03+5:302020-04-12T15:04:20+5:30

होय, तूर्तास चर्चा तीच आहे...

all not well in nagarjuna akkineni family samantha and chaitanya are not happy-ram | काय सांगता? नागार्जुनच्या फॅमिलीत धुसफूस?

काय सांगता? नागार्जुनच्या फॅमिलीत धुसफूस?

ठळक मुद्देनागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे लग्न झाले आहे. 

साऊथ सुपरस्टार नागाजुर्न व त्यांचे कुटुंब नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहते. अनेक निमित्ताने हे कुटुंब एकत्र दिसते. पण अलीकडे ब-याच दिवसांपासून हे कुटुंब एकत्र दिसले नाही. अक्कीनेनी कुटुंब असे जगापासून फटकून वागू लागल्यावर चर्चा तर होणार. होय, तूर्तास तीच चर्चा आहे. नागार्जुनच्या कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याची कुजबूज साऊथ इंडस्ट्रीत ऐकू येऊ लागली आहे.

अलीकडे अखिल अक्किनेनीने त्याचा 26 वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी साऊथ इंडस्ट्रीतल्या बहुतांश सगळ्याच लोकांनी अखिलला सोशल मीडियावर विश केले. पण याप्रसंगी त्याचा भाऊ नागा चैतन्य आणि नागाची वाईफ सामंथा रूथ प्रभू हे दोघेही सोशल मीडियावर अखिलला विश करताना दिसले नाही़. यामुळे चर्चांना आणखीच ऊत आला.
नागा चैतन्य हा आपल्या आई आणि सावत्र पित्यासोबत भलेही चेन्नईत राहतो. पण असे असूनही नागा, अखिल, नागार्जुन हे सगळे अनेकप्रसंगी एकत्र दिसतात. अलीकडे त्यांच्यात दुरावा वाढल्याची चर्चा खरी असेल तर त्याचे कारण त्यांनाच ठाऊक.

नागार्जुन यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न 1984 साली लक्ष्मी दग्गुबतीसोबत झाले होते. पण सहा वर्षांनी म्हणजे 1990 मध्ये दोघे विभक्त झाले. पहिल्या लग्नापासून नागार्जुन यांना एक मुलगा असून नागा चैतन्य हे त्याचे नाव आहे. नागासुद्धा साऊथ चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिव असून त्याची पत्नी अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आहे.  

 नागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे लग्न झाले आहे. या लग्नाची प्रचंड चर्चा मीडियामध्ये रंगली होती. नवदाम्पत्याचा लूक, राजेशाही थाटातील सोहळा, दागदागिने आणि दिग्गजांची उपस्थिती यामुळे हा सोहळा वर्षभरातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी लग्नसोहळा ठरला होता. 
नागार्जुनची सून सामंथा ही सुद्धा एक अभिनेत्री आहे़ 

Web Title: all not well in nagarjuna akkineni family samantha and chaitanya are not happy-ram