'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:35 PM2023-01-02T13:35:53+5:302023-01-02T13:36:27+5:30

शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या पठाण (Pathaan Movie) या चित्रपटावरुन सध्या जोरदार वाद सुरू आहे. तरीदेखील या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

All first day shows of 'Pathan' are house full; 'Record Break' Advance Booking for Shahrukh's movie in this country | 'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

googlenewsNext

शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या पठाण (Pathaan Movie) या चित्रपटावरुन सध्या जोरदार वाद सुरू आहे. पठाण चित्रपटातील एक गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. 'बेशरम रंग' (Besharam Rang) असे या गाण्याचे नाव असून या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनीमुळे चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाऊ लागले. लोकांनी चित्रपटाबाबत अनेक मीम्सही बनवले. त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेत बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. नुकतेच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. इतक्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतरही आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. परदेशात या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने जर्मनीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तिथे शोच्या पहिल्या दिवशीचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. शाहरुखला तसा ग्लोबल स्टार मानला जातो, हे यावरून स्पष्ट होते. त्याची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. या चित्रपटाने जर्मनीमध्ये आगाऊ बुकिंग करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच इतका जबरदस्त प्रतिसाद मिळणे ही त्याच्या निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग २८ डिसेंबरपासून जर्मनीमध्ये सुरू झाली आहे. ज्यामध्ये चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशीच्या सर्व शोचे आगाऊ बुकिंग हाऊसफुल्ल आहेत. हा प्रतिसाद पाहून या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना 'पठाण'मध्ये आवश्यक बदल करून तो रिलीजपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यासोबतच काही सीन्सही चित्रपटातून काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: All first day shows of 'Pathan' are house full; 'Record Break' Advance Booking for Shahrukh's movie in this country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.