पूजा, आलिया आणि शाहिन या तिन्ही ‘भट्ट सिस्टर्स’नी केलेय एकत्र काम! काय तुम्हाला ठाऊक आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 11:12 IST2018-07-20T11:11:04+5:302018-07-20T11:12:05+5:30

महेश भट्ट यांच्या तिन्ही मुली पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि शाहिन भट्ट यांना एकत्र स्क्रिनवर पाहायला कुणाला आवडणार नाही. 

All 3 Bhatt daughters acted in the film Tamanna | पूजा, आलिया आणि शाहिन या तिन्ही ‘भट्ट सिस्टर्स’नी केलेय एकत्र काम! काय तुम्हाला ठाऊक आहे?

पूजा, आलिया आणि शाहिन या तिन्ही ‘भट्ट सिस्टर्स’नी केलेय एकत्र काम! काय तुम्हाला ठाऊक आहे?

महेश भट्ट यांच्या तिन्ही मुली पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि शाहिन भट्ट यांना एकत्र स्क्रिनवर पाहायला कुणाला आवडणार नाही. असा योग येईल वा नाही, ते आम्हाला ठाऊक नाही. पण हो, काही वर्षांपूर्वी मात्र असा योग जुळून आला होता. होय, ‘तमन्ना’ या चित्रपटात़ निर्माता म्हणून पूजा भट्टचा हा पहिला चित्रपट होता. पूजा भट्टने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटातील काही जुन्या फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. सोबत एक मोठ्ठी पोस्टही लिहिली आहे. 

आलियाने या चित्रपटात पूजाच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. तर शाहिन आशुतोष राणाची मुलगी बनली होती. पूजाने एक आणखी मजेशीर गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे, या चित्रपटाच्या शूटींगवेळी आलिया आणि शाहिन दोघीही आपआपली घरची खेळणीही घेऊन आल्या होत्या. चित्रपटात प्रॉप म्हणून या खेळण्यांचा वापर करण्यात आला होता. पूजा आपल्या पोस्टमध्ये लिहिते, माझ्या वडिलांनीही आम्हा तिन्ही बहिणींना एका चित्रपटात कास्ट केले होते. ही गोष्ट काळासोबत विस्मृतीत गेली होती. पण आज काही जुने फोटो हाती लागले आणि ती आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. सरतेशेवटी आपल्याकडे आठवणींच उरतात आणि यातल्या काही खरोखरीच सुंदर आठवणी असतात.

 

Web Title: All 3 Bhatt daughters acted in the film Tamanna