अलका याज्ञिक गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त, प्रकृती आता कशी आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 14:21 IST2026-03-31T14:20:42+5:302026-03-31T14:21:04+5:30

अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Alka Yagnik Health Update Hearing Loss Illness Padma Bhushan Award Interview | अलका याज्ञिक गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त, प्रकृती आता कशी आहे?

अलका याज्ञिक गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त, प्रकृती आता कशी आहे?

Alka Yagnik Health Update : भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायिकांमध्ये अलका याज्ञिक यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी फक्त भारतीयांचेच नाही तर जगभरातील संगीतप्रेमींचे मन जिंकले आहे. अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  २०२४ मध्ये त्यांना श्रवणदोषाच्या (Hearing Loss) एका दुर्मिळ आजाराचे निदान झाले होते. त्या अजूनही या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याचे समोर आले आहे.

आता एका ताज्या मुलाखतीत त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल नवीन माहिती दिली. 'एनडीटीव्ही'शी संवाद साधताना अलका याज्ञिक यांनी स्पष्ट केले की, प्रकृतीमुळे त्यांना सध्या गाणी रेकॉर्ड करणे किंवा नवीन प्रकल्प हाती घेणे शक्य होत नाहीये. अलका याज्ञिक म्हणाल्या, "मी अजूनही या आजाराशी झुंज देत आहे. अनेक संगीतकार आजही माझ्याकडे नवीन गाण्यांच्या ऑफर घेऊन येतात, पण सध्यातरी मला ते करणं शक्य नाहीये". एका विषाणू संसर्गामुळे त्यांना 'सेन्सोरिन्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस' (Sensorineural Nerve Hearing Loss) हा दुर्मिळ आजार झालाय. यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रसिद्धीपासून दूर असतानाच, यावर्षी भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "माझ्या मुलीने मला या सन्मानाबद्दल सांगितले आणि मला खूप आनंद झाला. अशा पुरस्काराची मी कधी अपेक्षा केली नव्हती, पण जेव्हा तो मिळतो, तेव्हा त्याचे स्वागतच असते. मी भारत सरकारची ऋणी आहे".

अलका याज्ञिक यांनी शेवटचे गाणे दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटासाठी रेकॉर्ड केले होते. 'नरम कलाजा' असे या गाण्याचे बोल असून, त्याला ए. आर. रहमान यांनी संगीत दिले होते. हे गाणे प्रचंड गाजले, मात्र त्यानंतर आजारपणामुळे त्यांनी रेकॉर्डिंगपासून ब्रेक घेतला आहे.

Web Title : अलका याग्निक श्रवण हानि से जूझ रही हैं; स्वास्थ्य अपडेट और पद्म भूषण सम्मान।

Web Summary : अलका याग्निक सेंसरिनुरल श्रवण हानि से जूझ रही हैं, जिससे रिकॉर्डिंग मुश्किल हो रही है। स्वास्थ्य चुनौतियों के बावजूद, उन्हें पद्म भूषण मिला। उनका आखिरी गाना इम्तियाज अली की 'अमर सिंह चमकिला' के लिए था।

Web Title : Alka Yagnik battling hearing loss; health update and Padma Bhushan honor.

Web Summary : Alka Yagnik is battling sensorineural hearing loss, making recording difficult. Despite health challenges, she received the Padma Bhushan. Her last song was for Imtiaz Ali's 'Amar Singh Chamkila'.