​आलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर १

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 10:35 IST2018-04-18T05:05:23+5:302018-04-18T10:35:33+5:30

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामुळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. म्हणूनच कदाचित या आठवड्याच्या ...

Aliya Bhat and Varun Dhawan scored number 1 on the scorer Trends India list | ​आलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर १

​आलिया भट आणि वरूण धवन स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या लिस्टवर बनले नंबर १

लिवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामुळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. म्हणूनच कदाचित या आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला आहे. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन ठरला आहे तर तरूणाईवर सध्या अधिराज्य गाजवणारी आलिया भट नंबर वन अभिनेत्री ठरली आहे.
अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत १२.५२ गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे तर आलिया भट ७६.२२ गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन वर आहे.  
ऑक्टोबर चित्रपटाबद्दल आणि त्यातल्या वरूणच्या भूमिकेबद्दल सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हायरल न्यूज सारख्या सोशल मीडियावर भरपूर लिहिलं जातंय तर आलिया भटच्या राजी सिनेमाचा सध्या फस्ट लूक आऊट झाला आहे. या सिनेमात ती गुप्तहेराच्या भूमिकेत असल्याने चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळेच तर बॉलिवूड हार्टथ्रोब वरूण पहिल्या क्रमांकावर तर रणवीर सिंह दुसऱ्या स्थानी, सिध्दार्थ मल्होत्रा तिसऱ्या स्थानी आणि टायगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे. अभिनेत्रींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दीपिका पादूकोण आणि आलियामध्ये ३८ गुणांचं अंतर आहे. तिसऱ्या स्थानावर सोनाक्षी आणि चौथ्या स्थानावर सोनम कपूर आहे. याविषयी अश्वनी कौल सांगतात, “आलियाची युवापिढीवर भुरळ आहे. ती जे काही करते, त्याविषयी जाणून घेण्यात तरूणाईला रस असतो. आलिया भट आपल्या सिनेमामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मीडिया पब्लिकेशन्स आणि सोशल मीडियावर सतत चर्चेत राहिली होती. म्हणूनच ती स्कोर ट्रेंड इंडियावर नंबर वन ठरली आहे. आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

Also Read : सिद्धार्थ मल्होत्राचा ‘पत्ता कट’! ‘आशिकी3’मध्ये आलिया भट्टसोबत वरूण धवनची वर्णी!!

Web Title: Aliya Bhat and Varun Dhawan scored number 1 on the scorer Trends India list