​‘एली’च्या कव्हरपेजवर आलियाचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 21:42 IST2016-11-06T21:42:05+5:302016-11-06T21:42:05+5:30

बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिने नुकतेच ’एली’ या आंतराष्ट्रीय मॅग्झिनसाठी फोटोशूट केले आहे. ‘एली’च्या वेडिंग इश्यूच्या कव्हरपेजवर ती ...

Ali's hot guess on 'cover' cover | ​‘एली’च्या कव्हरपेजवर आलियाचा हॉट अंदाज

​‘एली’च्या कव्हरपेजवर आलियाचा हॉट अंदाज

ong>बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिने नुकतेच ’एली’ या आंतराष्ट्रीय मॅग्झिनसाठी फोटोशूट केले आहे. ‘एली’च्या वेडिंग इश्यूच्या कव्हरपेजवर ती झळकलेली दिसेल. ‘एली’ या नियतकालिकेला यावर्षी 20 वर्षे पूर्ण झाली आहेत हे विशेष. 

बॉलिवूडमध्ये सध्या मॅगझिन कव्हरपेजसाठी फोटोशूट करण्याचा ट्रेंड आल्याचे दिसतेय. काही दिवसांपूर्वी करिना कपूर व करिश्मा कपूर यांनी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या कपड्याचे ‘हॅलो’ मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. नुकतेच एश्वर्या राय बच्चन हिने ‘वोग’ मॅग्झिनसाठी हॉट फोटोशूट केला होता. याच मालिकेत आलिया भट्ट हिनेही ‘एली’ मॅगझिनच्या कव्हरपेज व स्पेशल इश्साठी फोटोशूट केले आहे. 

नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध होणाºया एलीच्या वेडिंग स्पेशल इश्यूसाठी हे फोटोशूट केले आहे. यात आलिया भट्ट अतिशय हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अंदाजात दिसत आहे. आलियाने लाल लहेंगा व चोळी घातला असल्याने तिचा लूक अधिकच हॉट ठरतोय. या फोटोशूटमध्ये तिचे क्लिवेज स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे हे फोटोशूट करताना आलियाने पाहाणाºयाचे लक्ष आपल्या चेहºयाकडे आकर्षित व्हावे यासाठी बरीच काळजी घेतली आहे. तिने डायमंड चोकर आणि इअररिग्ंज घातले असून, यामुळे तिचा लूक अधिकच परफेक्ट झालेला दिसतो. 

आलियाने अनामिका खन्ना हिने डिझाईन केलेले ड्रेस परिधान केले असून परफेक्ट लूक देण्यासाठी डेनिअल बेवर याने केशसज्ज केली आहे.  या मॅग्झिनच्या या स्पेशन इश्यूसाठी तिने विविध परिधानात आपले फोटो काढले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व फोटो लाल रंगाच्या ड्रेसेसमध्ये काढले आहेत. यामुळे तिचा लूक आकर्षित करणारा ठरतो आहे. आलिया लवकर ‘डीअर जिंदगी’मध्ये शाहरुखसोबत तर ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसेल. 





Web Title: Ali's hot guess on 'cover' cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.