​आलियाची बहीण शाहीन डिप्रेशनची शिकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 14:09 IST2016-12-04T14:09:33+5:302016-12-04T14:09:33+5:30

मुकेश भट्ट आणि त्यांचे अख्खे कुटुंब म्हणजे बिनधास्त आणि सडेतोड बोलणारे. मग ती पूजा असो वा आलिया भट्ट. आलियाने ...

Alii's sister Shahin is a victim of depression !! | ​आलियाची बहीण शाहीन डिप्रेशनची शिकार!!

​आलियाची बहीण शाहीन डिप्रेशनची शिकार!!

केश भट्ट आणि त्यांचे अख्खे कुटुंब म्हणजे बिनधास्त आणि सडेतोड बोलणारे. मग ती पूजा असो वा आलिया भट्ट. आलियाने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. होय, शाहीन डिप्रेशनची शिकार असल्याचा. शाहीन म्हणजे, आलियाची लहान बहीण. 

alia bhatt sister shaheen bhatt

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, आलियाने शाहीनच्या या आजारपणाबद्दल माहिती दिली. शाहीन अतिशय संवेदनशील मानसिक स्थितीतून जातेयं. आमचे अख्खे कुटुंब आणि जवळचे मित्र हे जाणतात. शाहीन डिप्रेशनची शिकार आहे. केवळ डिप्रेशनच नाही तर तिला इंसोन्मिया अर्थात झोप न येण्याचा आजार आहे. यामुळे मी आणि शाहीन अनेकदा गप्पा-गप्पांमध्ये अनेक रात्री जागवल्या आहेत. माझ्यात आणि शाहीनमध्ये अतिशय चांगले आणि प्रामाणिक नाते आहे. पण तिच्या या स्थितीत मी तिची कुठलीच मदत करू शकत नाही. यामुळे अनेकदा मला स्वत:ला हतबल झाल्यासारखे वाटते. अर्थात शाहीन एक धाडसी मुलगी आहे. ती या आजारपणाविरूद्ध स्वत: लढते आहे. ती नियमित उपचार घेते आहे, असे आलियाने सांगितले.

मी कायम शाहीनसोबत आहे. जेव्हा केव्हा तिला माझी गरज असेल, तेव्हा मी तिच्यासोबतत असेल. शेवटी ही लढाई तिची तिला लढायचीच. मनात असूनही यात मी तिची कुठलीही मदत करू शकत नाही. पण मी नि:स्वार्थपणे तिच्या सोबत आहे,असेही आलिया म्हणाली. या आजारपणातून शाहीन नक्की बाहेर पडेल,असा विश्वासही तिने व्यक्त केला.
आलिया आणि शाहीनचे बॉन्डिंग अनेकदा दिसले आहे. अलीकडे दोघींनी एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकताच शाहीनचा बर्थ डे झाला. या बर्थ डेला आलियाचा बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा हा सुद्धा हजर होता.

Web Title: Alii's sister Shahin is a victim of depression !!