​प्रियांकाच्या वाटेवर आलिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 13:19 IST2016-12-01T13:19:08+5:302016-12-01T13:19:08+5:30

चुलबुली आलिया भट्ट सध्या यशाची चव चाखतेयं. एकापाठोपाठ एक असे अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर आलिया आता प्रियांका चोप्राच्या वाटेवर ...

Alia on the way to Priyanka ... | ​प्रियांकाच्या वाटेवर आलिया...

​प्रियांकाच्या वाटेवर आलिया...

लबुली आलिया भट्ट सध्या यशाची चव चाखतेयं. एकापाठोपाठ एक असे अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर आलिया आता प्रियांका चोप्राच्या वाटेवर  पहिले पाऊल टाकण्यास आतूर आहे. आता प्रियांका चोप्राच्या वाटेवर म्हणजे, आलियाला हॉलिवूडची लॉटरी लागली की काय, असे तुम्ही पण समजाल. पण तसले काहीही नाहीय. आलिया प्रियांकाच्या वाटेवर चालण्यास सज्ज झालीयं म्हणजे आलिया निर्मिती क्षेत्रात उतरणार सज्ज झाली आहे.
अलीकडे एका मुलाखतीत आलियाने याबाबतचे संकेत दिले. सध्या तू यशाच्या शिखरावर आहेस, पण भविष्यात आणखी काय करायची तुझी इच्छा आहे, असा प्रश्न आलियाला या मुलाखतीत केला गेला. यावर आलियाने अतिशय स्मार्ट उत्तर दिले. मी मनोरंजन जगतातील प्रत्येक माध्यमात मला माझा हात आजमावून बघायचायं, असे ती म्हणाली. प्रियांका चोप्राप्रमाणे प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीत हात आजमावणार का? असा प्रश्न विचारल्यावर आलियाने होकारार्थी उत्तर दिले. होय, मी सगळे काही करू इच्छिते. अगदी प्रियांकाप्रमाणे प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रातही उतरू इच्छिते. प्रियांकाने एक लांबचा पल्ला गाठलायं. तिने जे मिळवलं, त्या यशाला तोड नाही. ती माझ्यासाठी निश्चितपणे पे्ररणादायी आहे. मलाही तिच्या पावलावर पाऊल ठेवणे आवडेल. अर्थात सध्या मी माझे संपूर्ण लक्ष चित्रपटांवर केंद्रीत केले आहे. पण येत्या काळात निर्मितीच काय पण मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक माध्यमात काम करणे मला आवडेल, असे आलिया म्हणाली.
एकंदर काय तर आलियाच्या स्वप्नांना अंत नाही. शिवाय या स्वप्नांमध्ये रंग भरण्याची तिची उमेद आणि महत्त्वाकांक्षाही जबर आहे. आलियाची सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, शेवटी आम्हीही याच शुभेच्छा  देतो.

Web Title: Alia on the way to Priyanka ...