आलिया म्हणते,‘...तर मी सिंगल राहीन!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 13:49 IST2016-11-22T13:49:08+5:302016-11-22T13:49:08+5:30

बॉलिवूडची ‘चुलबुली गर्ल’ आलिया भट्ट  कुठल्या न कुठल्या कारणाने सतत चर्चेत असतेच. सध्या ती चित्रपटामुळे नव्हे तर तिने नुक ...

Alia says, '... then I will be single!' | आलिया म्हणते,‘...तर मी सिंगल राहीन!’

आलिया म्हणते,‘...तर मी सिंगल राहीन!’

लिवूडची ‘चुलबुली गर्ल’ आलिया भट्ट  कुठल्या न कुठल्या कारणाने सतत चर्चेत असतेच. सध्या ती चित्रपटामुळे नव्हे तर तिने नुक तेच केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं काय झालं की, आलियाने सिंगल राहण्याचा विचार  केलाय? ‘हॅण्डसम हंक’ सिद्धार्थ मल्होत्रा याच्यावरचे प्रेम तिला मिळाले नाही तर ती सिंगल राहील असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका. कारण त्यांचे नाते आजही पूर्वीप्रमाणे ‘लॉयल’ आहे.

एका मुलाखतीदरम्यान बोलताना तिने सिद्धार्थसोबतच्या नात्याबद्दल एक वक्तव्य केले. ती म्हणते,‘जोपर्यंत मी लग्न करणार नाही तोपर्यंत मी सिंगल आहे. ज्यादिवशी मी लग्न करेन त्यावेळी मी रिलेशनशिपमध्ये असेन.’ सिद्धार्थसोबतच्या नातेसंबंधांविषयी सुरू असलेल्या चर्चेबद्दल बोलताना ती म्हणते,‘मी आणि सिद एक मेकांशी बोलत नाही, भेटत नाही अशी जी चर्चा सतत सुरू असते ती चुकीची आहे. मी सध्या वरूणसोबत शूटिंग करतेय. बॉलिवूडमधील माझ्या जर्नीला ४ वर्षे पूर्ण झाले असून मी माझं काम एन्जॉय करतेय. तसंच सिदचंही आहे. ज्यावेळी लोक चर्चा करतात की, आम्ही बोलत नाही तेव्हा मला फार वाईट वाटतं. खरंतर लोकांनी अशा अफवा पसरवणं बंद करावं. आम्ही चांगले मित्र आहोत.’ 

‘स्टुडंट आॅफ द इयर’ चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट हिट झाले. ‘हायवे’,‘शानदार’,‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ यासारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्यानंतर आता आलिया एक हरहुन्नरी कलाकार म्हणून नावारूपाला येतेय. 

Web Title: Alia says, '... then I will be single!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.