ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 06:00 IST2018-12-28T06:00:00+5:302018-12-28T06:00:00+5:30

बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या पार्टीच्या मूडमध्ये आहे. आलिया भट्टनेही इन्स्टाग्रामवर तिचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर कुठेच दिसत नाहीय.

Alia celebrate x-mas alone because ranber was not with her | ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन

ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन

ठळक मुद्देआलिया आणि रणबीर दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला आधीच मंजूरी दिली आहे आलिया आणि रणबीर  'ब्रह्मास्त्र' शूटिंगमध्ये बिझी आहेत

बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या पार्टीच्या मूडमध्ये आहे. आलिया भट्टनेही इन्स्टाग्रामवर तिचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर कुठेच दिसत नाहीय. रणबीर आणि आलिया दोघे सेलिब्रेशन एकत्र करणार होते मात्र फोटोमध्ये आलिया एकटीच दिसतेय. तर दुसऱ्या व्हिडीओत रणबीर कपूर आर्यन मुखर्जीसोबत पार्टीत जाताना दिसतोय.      

आलिया आणि रणबीर दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला आधीच मंजूरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या वर्षी हे कपल लग्नाच्या बेडीत अडू शकतो. दोघांच्या कुटुंबीयांकडून देखील त्यांच्या नात्याला मान्यता देण्यात आलेली आहे.  

सध्या आलिया आणि रणबीर  'ब्रह्मास्त्र' शूटिंगमध्ये बिझी आहेत.या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतोय. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. रिपोर्टनुसार आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून रणबीर-आलिया ख्रिसमसच्या आधी न्यूयॉर्कला जाणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये रणबीरचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर आई आधीपासूनच आहेत.     

Web Title: Alia celebrate x-mas alone because ranber was not with her