आलिया भटने घातले असे पारदर्शक कपडे, पाहून नेटकरी भडकले...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 12:06 IST2021-07-12T12:06:01+5:302021-07-12T12:06:19+5:30
गेल्या काही दिवसांपासून आलिया रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. पण सध्या तिची चर्चा होतेय ती तिच्या आऊटफिटमुळे.

आलिया भटने घातले असे पारदर्शक कपडे, पाहून नेटकरी भडकले...!!
आलिया भट (Alia Bhatt) सध्या जाम बिझी आहे. एकापाठोपाठ सिनेमे हातावेगळे करण्यासाठी दिवसरात्र काम करतेय. गेल्या काही दिवसांपासून आलिया रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. पण सध्या तिची चर्चा होतेय ती तिच्या आऊटफिटमुळे. होय, आपल्या विचित्र लुकमुळे सध्या ती ट्रोल होतेय.
अलीकडे आलिया घराबाहेर दिसली आणि पापाराझींनी तिच्याभोवती गर्दी केली. या फोटोंमध्ये आलिया ग्रे कलरच्या टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये दिसतेय. तोंडावर काळा मास्क आणि पायात पांढ-या चपला असा तिचा लुक आहे. नेहमीप्रमाणे या टॉपमध्येही ती सुंदर दिसतेय. पण टॉप जरा जास्तच पारदर्शक आहे आणि यामुळे आलिया ट्रोल होतेय.
आलियाचे कपडे पाहून काही युजर्सनी तिची तुलना मलायकासोबत करत खिल्ली उडवली. अरे, आधी मला मलायकाच वाटली, असे एका युजरने लिहिले.
आलियाच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर सध्या तिच्याकडे अनेक सिनेमे आहेत. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये आलिया दिसणार आहे. बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. याशिवाय बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा तिच्याकडे आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाचे अद्यापही शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदा रणबीर कपूरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.