हाँगकाँगमध्ये वाढदिवस साजरा करणार आलिया भट, रणबीर-राहासोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:53 IST2026-03-14T12:06:25+5:302026-03-14T12:53:24+5:30

हाँगकाँगमध्ये एन्जॉय करतायेत रणबीर आलिया अन् राहा

Alia Bhatt to celebrate birthday in Hong Kong video of her walking with Ranbir-Raha goes viral | हाँगकाँगमध्ये वाढदिवस साजरा करणार आलिया भट, रणबीर-राहासोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल

हाँगकाँगमध्ये वाढदिवस साजरा करणार आलिया भट, रणबीर-राहासोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट उद्या १५ मार्च रोजी वाढदिवस साजरा करणार आहे. आलिया ३३ वर्षांची होणार आहे. बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रणबीर कपूर आलिया आणि लेक राहाला घेऊन हाँगकाँगला पोहोचला आहे. तिथे हे कुटुंब मजा मस्ती करत आहेत. एका पार्कमध्ये राहाला फिरवातानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आलिया भट प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी आहेच शिवाय वैयक्तिक आयुष्यातही ती सेट आहे. लग्न आणि आता लेकीसोबत ती व्यग्र आहे. रणबीर-आलियाची लेक राहा ४ वर्षांची असून तीच आता त्यांचं आयुष्य बनली आहे. क्युट राहाचा आईबाबांसोबतचा बाँड सोशल मीडियावर सर्वांनीच पाहिला. हे तिघेही सध्या हाँगकाँगमध्ये व्हेकेशनवर आहेत. उद्या आलियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघेही क्वॉलिटी टाईम घालवत आहेत. हाँगकाँगमधील एका पार्कमध्ये राहा आईबाबांचा हात पकडून मस्त फिरताना दिसत आहे.  रणबीर कपूर आणि आलिया एकदम कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया प्रोफेशनल आयुष्यात व्यग्र होते. दोघंही भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमाचं शूट करत होते. तर रणबीर 'रामायण' सिनेमाचीही तयारी करत होता. तरी वेळात वेळ काढून ते लेकीसोबत दिसायचे. नुकतंच टी २० विश्वचषकाच्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगलेला सेमी फायनल सामना पाहण्यासाठी आलिया आणि रणबीर वानखेडेवर आले होते. त्यांच्यासोबत चिमुकल्या राहानेही मॅच एन्जॉय केली. तेव्हा या तिघांचे फोटो, व्हिडीओ  सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 
 

Web Title : आलिया भट्ट रणबीर और राहा के साथ हांगकांग में जन्मदिन मनाएंगी।

Web Summary : आलिया भट्ट रणबीर कपूर और बेटी राहा के साथ हांगकांग में अपना 33वां जन्मदिन मना रही हैं। परिवार को एक पार्क में क्वालिटी टाइम बिताते हुए देखा गया, जिसके वीडियो वायरल हो रहे हैं। युगल पेशेवर प्रतिबद्धताओं को पारिवारिक समय के साथ संतुलित कर रहा है।

Web Title : Alia Bhatt celebrates birthday in Hong Kong with Ranbir and Raha.

Web Summary : Alia Bhatt is celebrating her 33rd birthday in Hong Kong with Ranbir Kapoor and their daughter, Raha. The family was spotted enjoying quality time together in a park, with videos going viral. The couple is balancing professional commitments with family time.