इंशाअल्लाह! भन्साळींच्या चित्रपटात सलमान खान-आलिया भटची जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 11:53 IST2019-03-19T11:48:45+5:302019-03-19T11:53:07+5:30

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अ‍ॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

alia bhatt to star opposite with salman khan in sanjay leela bhansalis inshallah | इंशाअल्लाह! भन्साळींच्या चित्रपटात सलमान खान-आलिया भटची जोडी!!

इंशाअल्लाह! भन्साळींच्या चित्रपटात सलमान खान-आलिया भटची जोडी!!

ठळक मुद्देतूर्तास आलिया भट हिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. लवकरच आलिया धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’मध्ये दिसणार आहे. यानंतर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती झळकणार आहे.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अ‍ॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी खुद्द सलमानने याबाबतची अधिकृत घोषणा केली.


‘बरोबर २० वर्षांनंतर मी संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये काम करतोय, याचा मला आनंद आहे. आलियासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे. इंशाअल्लाह, हा प्रवास यशस्वी होवो,’ असे सलमानने लिहिले.




सलमाननंतर लगेच आलियानेही ही बातमी कन्फर्म केली. ‘ खुल्या डोळ्यांनी स्वप्न पाहा आणि मी हे करू शकते, असे म्हणा. संजय सर व सलमान एकत्र कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत. ‘इंशाअल्लाह’मध्ये या दोघांसोबत काम करण्यास प्रचंड उत्साहित आहे,’ असे ट्विट आलियाने केले.
तूर्तास आलिया भट हिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. लवकरच आलिया धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’मध्ये दिसणार आहे. यानंतर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती झळकणार आहे. यात ती बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनचाच ‘तख्त’ आणि ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपटही आलियाने साईन केला आहे. आता भन्साळींच्या चित्रपटात आलियाची वर्णी लागली आहे. आलिया व सलमानची जोडी पाहायला तुम्ही किती उत्सूक आहात, ते सांगायला विसरू नका.
सलमानचे म्हणाल तर सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. यापाठोपाठ ‘दबंग 3’ या चित्रपटात सलमान दिसणार आहे. ‘दबंग 3’ हातावेगळा करताच भाईजान भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये बिझी होणार आहे.

Web Title: alia bhatt to star opposite with salman khan in sanjay leela bhansalis inshallah