आलिया भटचा नवा लूक पाहुन चाहते झाले फिदा, आतापर्यंत मिळाले इतके लाख लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:45 IST2020-12-16T18:45:00+5:302020-12-16T18:45:01+5:30

आलिया भट सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Alia bhatt shares stunning photo of her on instagram | आलिया भटचा नवा लूक पाहुन चाहते झाले फिदा, आतापर्यंत मिळाले इतके लाख लाईक्स

आलिया भटचा नवा लूक पाहुन चाहते झाले फिदा, आतापर्यंत मिळाले इतके लाख लाईक्स

आलिया भट सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या चाहत्यांसोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आलियाने नुकतचा ब्लॅक रंगाच्या आऊटफिटला एक स्टनिंग फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आलियाच्या या फोटोला सोशल मीडियावर पसंती मिळते आहे. ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया ग्लॅमरस दिसते आहे. 'कॅजुअली फ्लेक्सिंग' असे कॅप्शन आलियाने हा फोटो पोस्ट करताना दिले आहे. 

फोटो अपलोड केल्यापासून काही तासांतच या फोटोला 7 लाखापेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. अलीकडेच आलिया बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत गोव्याहुन परतली आहे. गोव्यामध्ये एका फुटबॉल टीमला चिअर करण्यासाठी दोघे गेले होते.  

काही दिवसांपूर्वी आलिया एस.एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेली होती. या सिनेमात ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट आणि ऑलिव्हिया मॉरिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'आरआरआर'च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आलियाने 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग केलं. रणबीर कपूरसोबत ती 'ब्रह्मस्त्र' सिनेमात झळकणार आहे. यात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय 'गली बॉय'नंतर रणवीर सिंगसोबत पुन्हा एकदा ती स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला २०२१मध्ये सुरूवात केली जाणार आहे.

Web Title: Alia bhatt shares stunning photo of her on instagram