आलिया भट्टने शेअर केला बालपणीचा फोटो !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 21:31 IST2017-12-08T16:01:31+5:302017-12-08T21:31:48+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टने तिच्या सोशल अकाउंटवर आईसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt shared photo of childhood !! | आलिया भट्टने शेअर केला बालपणीचा फोटो !!

आलिया भट्टने शेअर केला बालपणीचा फोटो !!

लिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने तिचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटोमध्ये आलिया मॉम सोनी राजदान यांच्या कडेवर दिसत आहे. फोटोत आलिया खूपच क्युट दिसत आहे. २४ वर्षीय आलियाने हा फोटो शेअर करताना एक हॉर्टटचिंग मेसेजही शेअर केला. "Throwback to the person who always has my back, hands and legs! My life manual - Mama #throwbackthursday,"

काही दिवसांपूर्वीच आलिया अंबानींच्या पार्टीत बघावयास मिळाली होती. पार्टीतील तिच्या ड्रेसमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. आलियाने अतिशय स्वस्त ड्रेस परिधान करून पार्टीत हजेरी लावली होती. नेहमीच डिझायनरकडून खास डिझाइन केलेले महागडे ड्रेस घालून इव्हेंटमध्ये उपस्थित राहणारी आलिया या पार्टीत मात्र हटके अंदाजात होती. जेव्हा तिच्या ड्रेसची किंमत समोर आली तेव्हा त्यावर एकच चर्चा रंगली होती. दरम्यान, आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच क्युट दिसत आहे. लहानपणीचा आलियाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. कारण तिच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगले लाइक्स मिळत आहेत. 
 

दरम्यान, आलिया सध्या मेघना गुलजार यांच्या आगामी ‘राजी’ आणि जोया अख्तरच्या ‘गुल्ली बॉय’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचे हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये रिलीज होणार आहेत. आलियाने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. आलियाकडे बॉलिवूडची नेक्स्ट सुपरस्टार म्हणून बघितले जाते. 

Web Title: Alia Bhatt shared photo of childhood !!