तर असा असेल भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’! आलिया भटने दिले संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 06:00 IST2019-04-06T06:00:00+5:302019-04-06T06:00:02+5:30

‘इंशाअल्लाह’ हा चित्रपटही एक ‘कॉस्च्युम ड्रामा’ असेल का? असा थेट प्रश्न आलियाला अलीकडे विचारला गेला. यावर आलियाने जे काही उत्तर दिले, ते ऐकून अनेकजण अवाक झालेत

alia bhatt reveals secret about sanjay leela bhansalis film inshahalla | तर असा असेल भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’! आलिया भटने दिले संकेत!

तर असा असेल भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’! आलिया भटने दिले संकेत!

ठळक मुद्देसंजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात आलिया भाईजान सलमान खानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

बॉलिवूडचे ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आलिया भटचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात आलिया लीड भूमिकेत आहे. साहजिकच आलिया जाम आनंदात आहे.
भन्साळींच्या प्रत्येक चित्रपटाची हिरोईन ‘कॉस्च्युम ड्रामा’त महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तिच्या अंगावरचे वजनी पोशाख आणि दागिने  पाहतांना भान हरपायला होते. पण ‘इंशाअल्लाह’ कदाचित याला अपवाद ठरावा. होय, खुद्द आलियाने याबाबतचे संकेत दिले आहेत.


‘इंशाअल्लाह’ हा चित्रपटही एक ‘कॉस्च्युम ड्रामा’ असेल का? असा थेट प्रश्न आलियाला अलीकडे विचारला गेला. यावर आलियाने जे काही उत्तर दिले, ते ऐकून अनेकजण अवाक झालेत. ‘माझा हा चित्रपट कॉस्च्युम ड्रामा असेल कशावरून? होऊ शकते की, यातील माझी भूमिका अगदी उलट, अगदी आगळीवेगळी असेल,’असे आलिया म्हणाली. आलियाच्या या उत्तरावरून एक गोष्ट सगळ्यांना कळून चुकली, ती म्हणजे, भन्साळी यावेळी ‘कॉस्च्युम ड्रामा’ नाही तर काहीतरी वेगळे प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत.


संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात आलिया भाईजान सलमान खानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. तूर्तास आलियाकडे चित्रपटांची रांग लागली आहे. लवकरच आलिया धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’मध्ये दिसणार आहे. यानंतर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती झळकणार आहे. यात ती बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय धर्मा प्रॉडक्शनचाच ‘तख्त’ आणि ‘बाहुबली’ फेम एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपटही आलियाने साईन केला आहे.

 

Web Title: alia bhatt reveals secret about sanjay leela bhansalis film inshahalla