स्वस्त ड्रेस परिधान करून अंबानींच्या पार्टीत पोहोचली आलिया भट्ट, जाणून घ्या ड्रेसची किंमत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:49 IST2017-12-06T09:19:16+5:302017-12-06T14:49:56+5:30

बॉलिवूड स्टार्स नेहमीच प्रसिद्ध डिझायनरने डिझाइन केलेले महागडे ड्रेस परिधान करून पार्ट्यांमध्ये हजेरी लावत असतात. केवळ बॉलिवूड स्टार्सच नव्हे ...

Alia Bhatt reached Ambani's party by wearing a cheap dress, know the price of the dress !! | स्वस्त ड्रेस परिधान करून अंबानींच्या पार्टीत पोहोचली आलिया भट्ट, जाणून घ्या ड्रेसची किंमत!!

स्वस्त ड्रेस परिधान करून अंबानींच्या पार्टीत पोहोचली आलिया भट्ट, जाणून घ्या ड्रेसची किंमत!!

लिवूड स्टार्स नेहमीच प्रसिद्ध डिझायनरने डिझाइन केलेले महागडे ड्रेस परिधान करून पार्ट्यांमध्ये हजेरी लावत असतात. केवळ बॉलिवूड स्टार्सच नव्हे तर त्यांचे मुलेही महागडे ड्रेस परिधान करून पार्ट्यांमध्ये इतरांचे लक्ष आकर्षित करीत असतात. काही दिवसांपूर्वीच अंबानी परिवाराकडून एका मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट हिचाही समावेश होता. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, पार्टीत आलियाने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत खूपच नाममात्र होती. होय, आलियाने केवळ चार हजार रुपयांचा स्कर्ट आणि टॅण्क टॉप घातला होता. परंतु या ड्रेसमध्येही आलिया कमालीची सुंदर दिसत होती. तिचे रूप खूपच खुलून दिसत होते. 



आलियाने परिधान केलेला हा स्कर्ट मल्टी कलरचा होता. या लॅगकट स्कर्टसोबत आलियाने ब्लॅक कलरचा टॅण्क टॉप परिधान केला होता. जेव्हा आलियाची पार्टीत एंट्री झाली तेव्हा तिचा हा ड्रेस बघून कोणालाही तो स्वस्त असेल याबाबतचा अंदाज आला नाही. कारण या ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. पार्टीत येताच तिच्यात आणि अभिनेत्री कॅटरिना कैफमध्ये गप्पा रंगल्या. दोघी बराच काळ एकमेकींशी बोलत होत्या. आलिया या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. परंतु आता तिने परिधान केलेला ड्रेस स्वस्त असल्याचे समोर आल्यानंतर एकच चर्चा रंगत आहे. 





आलिया सध्या तिच्या आगामी ‘राजी है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. आपल्या पाच वर्षांच्या करिअरमध्ये आलियाने ‘स्टुडंट आॅफ द ईयर, हायवे, हम्टी शर्मा की दुल्हनिया, शानदार, उडता पंजाब यांसह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. आलियाचा इंडस्ट्रीमधील प्रवास पाहता तिच्याकडे नेक्स्ट सुपरस्टार म्हणून बघितले जाते. 

Web Title: Alia Bhatt reached Ambani's party by wearing a cheap dress, know the price of the dress !!