यांना पुन्हा पाठवा... देशात घेऊच नका म्हणत नेटिझन्स भडकले हॉलिडेवर गेलेल्या सेलिब्रेटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 14:58 IST2021-04-26T14:57:44+5:302021-04-26T14:58:58+5:30
हे सेलिब्रेटी भारतात परतले असून त्यांना सोशल मीडियाद्वारे लोकांनी चांगलेच सुनावले आहे.

यांना पुन्हा पाठवा... देशात घेऊच नका म्हणत नेटिझन्स भडकले हॉलिडेवर गेलेल्या सेलिब्रेटींवर
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रेटी सुट्टीवर गेले आहेत. मालदीव आणि हिल स्टेशनवर जाऊन ते सुट्टीचा आनंद घेत आहेत आणि तिथले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. यावरून सेलिब्रेटींना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तसेच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) व्हॅकेशनवर गेलेल्या सेलिब्रेटींवर निशाणा साधला होता. आता हे सेलिब्रेटी भारतात परतले असून त्यांना सोशल मीडियाद्वारे लोकांनी चांगलेच सुनावले आहे.
आम्ही आता यांचे चित्रपटच पाहाणार नाहीत असे लोक सोशल मीडियावरील कमेंटद्वारे सांगत आहेत. तसेच लॉकडाऊन हा केवळ गरिबांनाच असतो का असा प्रश्न देखील नेटिझन्स विचारत आहेत. यांना पुन्हा पाठवा.... परत येण्याची गरजच काय होती असे देखील लोक त्यांना सोशल मीडियाद्वारे विचारत आहेत.
रणबीर कपूर, आलिया भट, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, अनन्या पांडे, सारा अली खान यांसारखे सेलिब्रेटी व्हेकशनवर गेले होते. त्यातील अनेकजण नुकतेच भारतात परतले आहेत. देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) बिघडत चाललेल्या परिस्थितीत सेलिब्रेटी परदेशात सुट्टीचा आनंद घेत आहेत. तसेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. या सेलिब्रिटींवर नवाझुद्दीन प्रचंड भडकला होता. स्पॉटबॉयशी संवाद साधताना त्याने सांगितले होते की, 'लोकांना अन्न नाही आणि तुम्ही पैसे फेकून एन्जॉय करत आहात. थोडी तरी लाज बाळगा. '