Alia Bhatt Pregnancy: आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारताच भडकली करीना कपूर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 14:03 IST2022-08-01T14:03:36+5:302022-08-01T14:03:59+5:30
Kareena Kapoor Khan:अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत आहे. तिचा आगामी 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

Alia Bhatt Pregnancy: आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्न विचारताच भडकली करीना कपूर, म्हणाली...
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या चर्चेत आहे. तिचा आगामी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सध्या करीना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कोरोनामुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करीनाने अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. शूटिंगचे किस्से, विनोद सांगितले.
'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना प्रेग्नेंट होती. चित्रपटाच्या टीमने तिची काळजी घेतल्याचेही करीनाने सांगितले. मात्र एका प्रश्नामुळे करीनाचा पारा आणखी वाढला. करीनाला आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आले. हा प्रश्न ऐकून बेबो भडकली. तुम्ही आलियाला काही प्रेग्नेंसी टिप्स द्याल का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. पण करीनाला आलियाबद्दल विचारलेले आवडलं नाही.
बेबो म्हणाली की, मला माहित नाही की मी इतर लोकांच्या गर्भधारणेबद्दल का बोलावे आणि प्रतिक्रिया द्यावी. अशा वेळी कोणीही कोणाला काही बोलण्याच्या भानगडीत पडू नये. मलाही कोणी काही टिप्स दिल्या तर आवडत नाही, असेही करीनाने म्हटले.
करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. बेबोचा पती सैफ अली खान शिवाय दोन्ही मुलं तैमूर व जेह हे सुद्धा तिच्यासोबत आहेत. या स्टार कपलच्या लंडन व्हॅकेशनचे एक ना अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.