आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 11:14 IST2019-11-06T11:10:10+5:302019-11-06T11:14:20+5:30
या फोटोतील आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.

आलिया भटने केले अंडरवॉटर फोटोशूट, पाहा तिचा स्टनिंग अंदाज
आलिया भट जे काही करते ते खास आणि हटके करते. त्यामुळे सिनेमाविषयी किंवा मग तिच्या खाजगी जीवनाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. पुन्हा एकदा आलियाने तिच्यावर चर्चा करण्यास सगळ्यांना भाग पाडले आहे. ते म्हणजे आलिया भटचे खास फोटोशूट समोर आले आहे. मोनोकनी परिधान केलेल्या आलियाने अंडरवॉटर हे फोटोशूट केले आहे. तिचे अंडरवॉटर फोटो समोर येताच हे फोटो पाहून सारेच कमेंटस आणि लाईक्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोतील आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.
विशेष म्हणजे आलिया भट तिच्या लग्नामुळेही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डिझायनर सब्यासाची मुखर्जी दोघांचे ड्रेस डिझाइन करणार आहेत.शेफ ऋतु डालमियाला केटरिंग अरेंजमेंटसाठी अप्रोच करण्यात आले आहे. आता या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे येणा-या काळातच स्पष्ट होइल. तुर्तास या कपलच्या लग्नाची चाहते मात्र मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या आलिया आणि रणबीर लंडनमध्ये आहेत.लग्नाआधी व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचेही बोलले जात आहे. दोघांचे लंडनमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
आगामी काळात दोघेही ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सिनमात अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय झळकणार आहेत. तसेच आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा होण्यापाठी मागे सिनेमाचे प्रमोशन तर नाही ना असेही प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत.