आलिया भट्टच्या हस्ते झाले 'या' पुस्तकाचे ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 15:20 IST2017-05-17T07:11:50+5:302017-05-17T15:20:13+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने लेखक अमीष त्रिपाठीच्या आगामी पुस्ताकाच्या ट्रेलर लाँचला आली होती. अमीषचे 'सीता-वॉरियर ऑफ मिथिला' ...

Alia Bhatt launches a trailer for 'This Book' | आलिया भट्टच्या हस्ते झाले 'या' पुस्तकाचे ट्रेलर लाँच

आलिया भट्टच्या हस्ते झाले 'या' पुस्तकाचे ट्रेलर लाँच

लिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिने लेखक अमीष त्रिपाठीच्या आगामी पुस्ताकाच्या ट्रेलर लाँचला आली होती. अमीषचे 'सीता-वॉरियर ऑफ मिथिला' या पुस्तकाचे ट्रेलर  एका बुकस्टोरमध्ये लाँच करण्यात आले. अमीषने या पुस्तकात सीता या पात्राला आत्मनिर्भर दाखवण्यात आले आहे.  ट्रेलर लाँचमध्ये  दाखवण्यात आलेल्या सीताच्या पात्राबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढवण्यात आली आहे.  
यापुस्ताकाबाबत लेखकाचे म्हणणे आहे की, पुस्तकाचा हा ट्रेलर बघून मी खूप खूष आहे. मी ज्या प्रकारे माझ्या पुस्तकात सीताचे पात्र रंगवले आहे. ट्रेलरमध्ये ते हुबेहुबे सादर करण्यात आले आहे. या ही पुढे जाऊन तो म्हणाला की, या पुस्तकाचे ट्रेलर लाँच एक अशा अभिनेत्रीच्या हस्ते झाले जिने बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  त्यामुळे या ट्रेलर लाँच एक वेगळेच वजन प्राप्त झाले आहे.  

आलिया यावेळी म्हणाली, मी अमीषला पहिल्यांदाच भेटले आहे. त्याच्या पुस्तक लाँचच्या ठिकाणी झालेल्या हि आमची भेट खपूच खास आहे. मी इम्मोर्टल्स ऑफ मेलुबा हे पुस्तक वाचले आहे जे मला प्रचंड आवडले आहे. मला वाट अमीष पौराणिक गोष्टींना आजच्या जगाशी जोडून पुस्तकात मांडण्याची छान कला अवगत आहे. त्याचे पुस्तकं ही केवळ पुस्तक नसून एक अनुभव असतात.
आलियाचा काहि दिवसांपूर्वी बद्रीनाथ की दुल्हनिया हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आलियाने काही महिने ब्रेक घेतला आहे. सुट्टी संपल्यावर आलिया अयान मुखर्जीच्या ‘ड्रगन’ या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे...

Web Title: Alia Bhatt launches a trailer for 'This Book'