सावत्र भाऊ म्हणाला, मला आलिया व तिच्या आयुष्याशी देणेघेणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:05 IST2019-08-13T11:21:38+5:302019-08-13T12:05:26+5:30

आलिया भट  व रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. रणबीर नुकताच आलियाच्या वडिलांना म्हणजे महेश भट यांना भेटला आणि त्याने आलियासाठी लग्नाची मागणी घातली.  आता आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट आलिया व रणबीरच्या लग्नावर बोलला आहे.

alia bhatt half brother rahul bhatt reaction over marriage with ranbir kapoor | सावत्र भाऊ म्हणाला, मला आलिया व तिच्या आयुष्याशी देणेघेणे नाही

सावत्र भाऊ म्हणाला, मला आलिया व तिच्या आयुष्याशी देणेघेणे नाही

ठळक मुद्देराहुल भटबद्दल सांगायचे झाल्यास तो एक प्रोफेशनल ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसमागे तो आहे.

आलिया भट  व रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. रणबीर नुकताच आलियाच्या वडिलांना म्हणजे महेश भट यांना भेटला आणि त्याने आलियासाठी लग्नाची मागणी घातली.  आता आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट आलिया व रणबीरच्या लग्नावर बोलला आहे. पण तो जे काही बोलला, ते ऐकून अनेकांना धक्का बसला. होय, मला लग्नात बोलवले तर मी नक्की जाईल. पण आलिया आणि तिच्या आयुष्याशी मला काहीही देणेघेणे नाही, असे तो म्हणाला.


आलिया माझी सावत्र बहीण आहे. मी तिच्यासोबत राहत नाही. मला तिच्या आयुष्याबद्दल काहीही ठाऊक नाही. अर्थात मला रणबीर व आलियाची जोडी आवडते. त्यांनी मला लग्नात बोलवले तर मी नक्कीच जाईल, असे त्याने सांगितले.


राहुल भट हा महेश भट आणि किरण भट यांचा मुलगा आहे. किरण ही महेश भट यांची पहिली पत्नी आहे. महेश भट वयाच्या 20 व्या वर्षी कॉलेजमध्ये असताना लोरिए ब्राईट हिच्या प्रेमात पडले. आज तिला किरण भट म्हणून ओळखले जाते. पूजा भट आणि राहुल भट हे किरण व महेश भट यांची मुले. दोन मुले झाल्यानंतर  महेश   अभिनेत्री परवीन बॉबीच्या प्रेमात पडले. यामुळे महेश भट व किरण यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले होते. अर्थात परवीन बॉबीसोबतचे महेश भट यांचे नातेही फार काळ टिकले नाही. यानंतर महेश यांच्या आयुष्यात सोनी राजदान आली. विशेष म्हणजे, सोनी राजदानसोबतच्या अफेअरदरम्यानही किरण आणि महेश एकत्र राहत होते. यानंतर किरणला घटस्फोट न देताच महेश यांनी सोनी राजदानसोबत लग्न केले. त्यांना आलिया व शाहीन या दोघी मुली झाल्यात.

राहुल भटबद्दल सांगायचे झाल्यास तो एक प्रोफेशनल ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसमागे तो आहे. ‘दंगल’ चित्रपटासाठी बॉडी बनवताना आमिर खानने राहुलचीच मदत घेतली होती. अर्जुन कपूर यानेही त्याचे वजन कमी करण्यासाठी राहुलची मदत घेतली होती.

Web Title: alia bhatt half brother rahul bhatt reaction over marriage with ranbir kapoor