मैत्रिणीच्या पाठवणीचा क्षण येताच आलिया भट्ट झाली भावूक! पाहा, व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 12:47 IST2019-02-24T12:45:33+5:302019-02-24T12:47:04+5:30

बेस्ट फ्रेन्ड देविकाच्या लग्नात आलियाने धम्माल मस्ती केली. पण देविकाच्या पाठवणीचा क्षण आला आणि आलियाला भावूक झाली.

Alia Bhatt Gives An Emotional Speech At Her Childhood BFF's Wedding, Video Inside | मैत्रिणीच्या पाठवणीचा क्षण येताच आलिया भट्ट झाली भावूक! पाहा, व्हिडीओ!!

मैत्रिणीच्या पाठवणीचा क्षण येताच आलिया भट्ट झाली भावूक! पाहा, व्हिडीओ!!

ठळक मुद्देआलियाचा ‘गली बॉय’ हा सिनेमा अलीकडे प्रदर्शित झाला. लवकरच आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिची बेस्ट फ्रेन्ड देविका आडवाणीच्या लग्नाला हजेरी लावली. त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देविकाच्या या लग्नात आलियाने धम्माल मस्ती केली. पण देविकाच्या पाठवणीचा क्षण आला आणि आलियाला भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. या पाठवणीवेळचे आलियाचे फोटोही वेगाने व्हायरल होत आहे.


देविकाच्या लग्नात आलियाने एक लहानसे भाषणही केले. या वेळीही मैत्रिणीबद्दल बोलताना आलिया भावूक झाली. आलियाचे भाषण ऐकून देविकाही रडू लागली. बॉबी (देविका) व मी एकत्र एक खेळ खेळायचो. या खेळाचे नाव होते, अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅक्ट्रेस. या खेळाचा आमचा एक नियम असायचा. हा खेळ जिच्या घरी खेळला जायचा, ती अ‍ॅक्ट्रेस बनायची. मी नेहमी हिरोचा रोल करायची, असे आलिया बोलली आणि देविका रडू लागली.


या लग्नात आलियाचा अंदाज पाहण्यासारखा होता. तिचा न्यूड मेकअप आणि सिंपल लूक सगळ्यांनाच भावला. पण त्याहीपेक्षा तिचा भावूकपणा पाहून सगळेच भावूक झालेत.


आलियाचा ‘गली बॉय’ हा सिनेमा अलीकडे प्रदर्शित झाला. लवकरच आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. तूर्तास या चित्रपटापेक्षा आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. आलिया व रणबीर यांचे नाते आतश: कुणापासूनही लपलेले नाही. दोघांच्याही कुटुंबाने या नात्याला पसंती दिली आहे. आलिया व रणबीर लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा आहे. 

Web Title: Alia Bhatt Gives An Emotional Speech At Her Childhood BFF's Wedding, Video Inside