आलिया भटपेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तिची वहिनी, फ्लॉप चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडला केला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 20:45 IST2021-05-10T20:44:58+5:302021-05-10T20:45:23+5:30

आपल्या पहिल्या चित्रपटात तिने बरेच बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे ती चर्चेत आली.

Alia Bhatt daughter-in-law is bolder and more glamorous than her | आलिया भटपेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तिची वहिनी, फ्लॉप चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडला केला रामराम

आलिया भटपेक्षा बोल्ड आणि ग्लॅमरस आहे तिची वहिनी, फ्लॉप चित्रपटांमुळे तिने बॉलिवूडला केला रामराम

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. मात्र आलिया भटची वहिनी अभिनेत्री असून ती तिच्यापेक्षा खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. तुम्ही आलियाच्या वहिनीला ओळखतात. ही अभिनेत्री म्हणजे उदिता गोस्वामी. २००३ साली ‘पाप’ या चित्रपटाद्वारे उदिताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात ती अभिनेता जॉन अब्राहमच्या विरुद्ध दिसली होती.

उदिताने आपल्या पहिल्या चित्रपटात तिने बरेच बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे ती चर्चेत आली. त्यानंतर २००५ साली आलेल्या ‘झहर’ या चित्रपटातुन उदिताने सर्वाधिक ओळख मिळविली. या चित्रपटात उदिता इमरान हाश्मी सोबत दिसली होती. याशिवाय अभिनेत्री शमिता शेट्टीने देखील या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातही उदिता अतिशय बोल्ड दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचे पती मोहित सुरीने केले होते. 

या चित्रपटानंतर उदिताने ‘दिल दे दिया’, ‘अगर’ आणि ‘डायरी ऑफ द बटरफ्लाय’ सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले मात्र हे सिनेमे फ्लॉप ठरले. या चित्रपटांनंतर उदिताचे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता मोहित सूरी यांच्याशी प्रेम संबंध जुळले. झहर चित्रपटादरम्यान दोघांत मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केले.


 मोहित सूरीची आई हिना सूरी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची बहीण आहे. म्हणजेच महेश भट्ट हे नात्यातील मोहितचे मामा आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या नात्याने मोहितच्या बहिणी लागतात. चित्रपट सलग फ्लॉप गेल्यानंतर उदिताने बॉलिवूड मधून ब्रेक घेतला.

नुकत्याच एक मुलाखतीत उदिताने खुलासा केला की महेश भट हे तिने पुन्हा चित्रपट सुरू करावे यासाठी मागे लागले आहेत. पण तिने सध्या तिच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. आणि तिचा बॉलिवूडकडे वळण्याचा सध्या तरी काही विचार नाहीये.

मोहित आणि उदिताला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. 


 

Web Title: Alia Bhatt daughter-in-law is bolder and more glamorous than her