RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम; आलियावरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 10:26 IST2022-03-13T10:25:26+5:302022-03-13T10:26:59+5:30

RRR Celebration Anthem Promo सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या प्रोमोत आलिया भट दोन्ही साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत थिरकताना दिसतेय.

Alia Bhatt Dances With Ram Charan And Junior Ntr In Rrr New Song | RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम; आलियावरून हटणार नाही नजर

RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम; आलियावरून हटणार नाही नजर

आलिया भट  (Alia Bhatt), ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’  (RRR) हा सिनेमा येत्या 25 मार्चला तुमच्या आमच्या भेटीस येतोय. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  तूर्तास या चित्रपटाच्या गाण्याचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि हा प्रोमो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. आरआरआर सेलिब्रेशन अँथमचा हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या प्रोमोत आलिया भट दोन्ही साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत थिरकताना दिसतेय. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर वंदे मातरमचा झेंडा फडकवताना दिसतात. यानंतर गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात आलियाची एन्ट्री होते. आलियाचा दमदार लुक सध्या प्रचंड चर्चेत आहे. हे गाणं 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता रिलीज होणार  आहे.

आलियाने घेतली इतकी फी
 आरआरआर  सुपरस्टार राम चरण रामचरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. आलियाने यात राम चरणची पत्नी अल्लुरी सीता हिची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका फार मोठी नाही. या चित्रपटासाठी आलियानं   मोजून 10 दिवस शूटींग केलं. पण या 10 दिवसांच्या शूटींगसाठी तगडी रक्कम वसूल केली. या चित्रपटात आलिया केवळ 15 मिनिटांसाठी दिसणार आहे आणि  या 15 मिनटांच्या भूमिकेसाठी आलियानं तब्बल 6 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

आलिया राजामौली यांची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी येताच तिने होकार दिला. अर्थात 6 कोटींच्या बदल्यात. विशेष म्हणजे टॉलिवूडमध्ये एकाही अभिनेत्रीला लीड भूमिका करण्यासाठी इतकी फी मिळत नाही. आलिया बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने तोंडून शब्द काढला आणि आरआरआरच्या मेकर्सनी तो फुलासारखा झेलला, असं म्हणायला हरकत नाही.
 

Web Title: Alia Bhatt Dances With Ram Charan And Junior Ntr In Rrr New Song