‘रणबीरबाबू की दुल्हनियां’ बनण्यास आलिया भट्ट उतावीळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:23 IST2019-03-11T11:20:37+5:302019-03-11T11:23:24+5:30

रणबीर व आलिया दोघेही लवकरच लग्न करणार, अशी बातमी आहे. आता या बातमीला आणखी बळ मिळाले आहे.

alia bhatt changed her wedding plan for ranbir kapoor | ‘रणबीरबाबू की दुल्हनियां’ बनण्यास आलिया भट्ट उतावीळ!

‘रणबीरबाबू की दुल्हनियां’ बनण्यास आलिया भट्ट उतावीळ!

ठळक मुद्देतिशी ओलांडल्यानंतर लग्न करण्याचा प्लान आलियाने तूर्तास रद्द केला आहे आणि लवकरात लवकर ‘दुल्हनियां’ बनण्यास ती तयार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर व आलिया एकमेकांत गुंतले आणि सोनम कपूरच्या लग्नात एकत्र हजेरी लावत, त्यांनी आपले नाते जगजाहीर केले. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले. आता तर रणबीर व आलिया दोघेही लवकरच लग्न करणार, अशी बातमी आहे. आता या बातमीला आणखी बळ मिळाले आहे. होय, काही दिवसांपूर्वी आलिया ‘कॉफी विद करण 6’मध्ये आली होती. याच शोच्या निर्मात्यांनी आलियाचा एक अनसीन व्हिडीओ रिलीज केला आहे. यात आलिया लग्नाबद्दल बोलतेय.


‘मी ३० वर्षांपूर्वी मला लग्न करायला नको, असे मला आधी वाटायचे. याचे कारण म्हणजे, मला अभिनय करायचा होता. पण काळासोबत माझ्या विचारात थोडा बदल झालाय. एक योग्य व्यक्ति तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंतच काही विचार टिकतात. ती योग्य व्यक्ति आयुष्यात आली की, तुम्ही हेल्दी स्पेसमध्ये आहात, असे जाणवू लागते आणि गोष्टी बदलतात,’असे आलिया या व्हिडीओत म्हणतेय.

तिच्या या व्हिडीओमधून केवळ एकच गोष्ट दिसतेय, ती म्हणजे, तिशी ओलांडल्यानंतर लग्न करण्याचा प्लान आलियाने तूर्तास रद्द केला आहे आणि लवकरात लवकर ‘दुल्हनियां’ बनण्यास ती तयार आहे. रणबीर बाबूच्या येण्याने आलिया बदलली आहे, तिचे विचार बदलले आहेत. आता देर आहे ती केवळ रणबीर बाबू व आलियाच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची...

Web Title: alia bhatt changed her wedding plan for ranbir kapoor