Alia Bhatt : आलिया भटने लेकीसाठी निवडलं ‘हे’ युनिक नाव? लेकीच्या जन्माआधीच केला होता खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 16:22 IST2022-11-06T16:21:26+5:302022-11-06T16:22:00+5:30
Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby Girl: घरात ‘लक्ष्मी’ आल्याने कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई-बाबा बनलेल्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आता आलियाच्या मुलीचं नाव काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Alia Bhatt : आलिया भटने लेकीसाठी निवडलं ‘हे’ युनिक नाव? लेकीच्या जन्माआधीच केला होता खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) हिने आजच एका गोंडस मुलीला जन्म दिला. आज सकाळी 7.30 वाजता आलियाला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करण्यात आलं आणि काही तासांतच कपूर कुटुंबाने आपल्या राजकन्येच्या जन्माची गोड बातमी शेअर केली. घरात ‘लक्ष्मी’ आल्याने कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई-बाबा बनलेल्या आलिया व रणबीरवर (Ranbir Kapoor) अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आता आलियाच्या मुलीचं नाव काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आलिया व रणबीरने अद्याप मुलीच्या नावाबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. पण आलियाने कदाचित एक नाव आधीच ठरवलं आहे. होय, मुुलीच्या जन्माच्या खूप आधीच आलियाने या नावाबद्दल संकेत दिले होते. साहजिकच हे नाव एकदम ‘युनिक’ आहे आणि आलिया व रणबीरच्या नावाशी जुळलेलं आहे.
आलियाची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होतेय. ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रमोशनदरम्यान तिने एक मुलाखत दिली होती. तुझं नाव आलियाऐवजी काही वेगळं असतं तर तू कोणत्या नावाची निवड केली असती? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. तेव्हा आलियाने तिच्या आवडत्या नावाबद्दल खुलासा केला होता. हे नाव होतं, आयरा. आयरा या नावाची सुरूवात आलियाच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून होते. शिवाय यात रणबीरच्या नावाचं पहिलं अक्षर ‘र’ सुद्धा येतं. त्यामुळे आलिया आपल्या मुलीचं नाव आयरा ठेवू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
आयरा या नावाचा अर्थ अतिशय सुंदर आहे. आयरा म्हणजे, ज्यांचा आदर केला जातो, ज्यांच्यापासून लोक प्रेरणा घेतात. विद्येची देवी सरस्वतीचं नावही आयरा आहे.
आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुºया दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती.