आलिया भट-रणबीर कपूरला बहीण रिद्धिमा कपूरने न्यू ईअरला दिले हे खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:23 IST2019-01-09T12:16:05+5:302019-01-09T12:23:39+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भटच्या रोमांसची खूप चर्चा आहे. आलियाने रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत न्यूयॉर्कमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट केले.

Alia Bhat-Ranbir Kapoor, sister of Riddhima Kapoor, gave a special gift to New Year | आलिया भट-रणबीर कपूरला बहीण रिद्धिमा कपूरने न्यू ईअरला दिले हे खास गिफ्ट

आलिया भट-रणबीर कपूरला बहीण रिद्धिमा कपूरने न्यू ईअरला दिले हे खास गिफ्ट

ठळक मुद्देरिद्धिमाने रणबीर आणि आलियाला न्यू ईअरचे स्पेशल गिफ्ट दिलेयाआधी ही रिद्धिमाने आलियाला ब्रेसलेट गिफ्ट केले होते

सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भटच्या रोमांसची खूप चर्चा आहे. आलियाने रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत न्यूयॉर्कमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट केले. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरने सेलिब्रेशनचे फोटो तिच्या अकाऊंटवरुन शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील खूप झाले. आता अशी माहितीसमोर येतेय रिद्धिमाने रणबीर आणि आलियाला न्यू ईअरचे स्पेशल गिफ्ट दिले. 


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, रिद्धिमाने आलिया-रणबीरला गोल्ड रिंग गिफ्ट केली आहे. रिंगच्यावर AR असे लिहिले आहे. याआधी ही रिद्धिमाने आलियाला ब्रेसलेट गिफ्ट केले होते.  


रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत बोलायचे झाले तर या वर्षांत रणबीर व आलिया दोघेही लग्न करतील, असेही मानले जात आहे. आलियाचे पापा महेश भट्ट यांनी अलीकडेच याबाबतचे संकेत दिले होते.  द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले होते. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. आता केवळ हे कपल आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा कधी करते, ते फक्त बघायचेय. 
आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ शूटिंगमध्ये बिझी आहेत.या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतोय. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते. पुढच्या महिन्यात आलियाचा रणवीर सिंग सोबतचा 'गली बॉय' सिनेमा रिलीज होणार आहे. तसेच आलिया करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमात सुद्धा दिसणार आहे.  

Web Title: Alia Bhat-Ranbir Kapoor, sister of Riddhima Kapoor, gave a special gift to New Year