​आलिया म्हणाली, आय लव्ह सिद्धार्थ मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 18:46 IST2016-11-26T18:46:08+5:302016-11-26T18:46:08+5:30

Alia Bhatt Says, I love Siddharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट यांच्यातील नात्याच्या खुलासा जरी दोघही करीत नसले तरी त्यांच्या मनात काय चालले आहे याची कल्पना नकळत ते करून देताता. गुगलला दिलेल्या उत्तरातून तिने आपल्या आवडत्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

Ali said, "I love Siddharth Malhotra | ​आलिया म्हणाली, आय लव्ह सिद्धार्थ मल्होत्रा

​आलिया म्हणाली, आय लव्ह सिद्धार्थ मल्होत्रा

ong>बॉलिवूडची ‘बबली गर्ल’ अभिनेत्री आलिया भट्ट व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील नात्याबद्दल बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगते. दोघेही एकमेकांना ‘स्वीट कलीग’ म्हणतात, मात्र आलियाने एका प्रश्नाच्या उत्तरातून दोघांच्या नात्यामधील खुलासा केला आहे. आलियाने ‘आय लव सिद्धार्थ मल्होत्रा’ असे म्हंटले आहे. 

आलिया भट्ट व शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डिअर जिंदगी’ प्रदर्शित झाल्यावर आलियाच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. तिची प्रशंसा क रणाºयांत सिद्धार्थ मल्होत्रा याचा देखील समावेश आहे. सिद्धार्थने ट्विटरहून आलियाची प्रशंसा केली होती याच्या उत्तरादाखल तिने लव्ह यू असे लिहले होते. दोघांमधील संवादातून त्यांचे नात्याची कल्पना करता येत नाही. दोघांत चांगली मैत्री असल्यानेही ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट देऊ शकतात. मात्र दोघांत काही तरी नक्की आहे याचा खुलासा एका व्हिडीओतून झाला आहे. 

Alia and sidharth

नुकतेच एका ‘इंटरव्ह्यू’मध्ये सिद्धार्थला आलियाबद्दल विचारण्यात आले होते. यावर तो म्हणाला, इंडस्ट्रीमध्ये काम करताना आम्हाला अनेक लोकांच्या संपर्कात यावे लागते. आलियासोबत मी दोन चित्रपट केले आहेत. यामुळे आम्ही एकमेकांना पसंत करतो. सोबत काम केल्याने आमच्यात एक कंर्फट लेव्हल आहे. एखाद्या सहकलाकारासोबतअधिक काळ जुळून असणे चांगले वाटते. आलिया माझी सर्वांत प्रिय कलीग आहे असेही तो म्हणाला. 

आता एका व्हिडीओमधून आलियाने दोघांमधील ‘कथित’ कलीगचा खुलासा केला आहे. डिअर जिंदगीच्या प्रमोशन दरम्यान आलियाने गुगलवरून काही प्रश्नाची उत्तरे दिली. यावेळी तिला तू सिद्धार्थ मल्होत्राला पसंत करतेस का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर आलियाने होकारार्थी उत्तर देताना म्हणाली, हो निश्चितच आय लव्ह सिद्धार्थ मल्होत्रा. 

दोघांची उत्तरे समान आहेत यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की खरच दोघांता नक्की आहे तरी काय? पण चाहत्यांमध्ये दोघांची जोडी पसंत केली जाते हे तेवढेच खरे. दोघांनी आपल्या प्रेमाचा खुलासा जरा वेगळ्या पद्धतीने केला आहे. 


सौजन्य : बॉलिवूड लाईफ

Web Title: Ali said, "I love Siddharth Malhotra