​अक्षय साकारणार दारा सिंगची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 21:55 IST2016-12-10T21:55:35+5:302016-12-10T21:55:35+5:30

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. तो लवकर रुस्तम-ए-हिंद व अभिनेता दारा सिंगच्या भूमिका साकारताना ...

Akshay's role in Dara Singh's role! | ​अक्षय साकारणार दारा सिंगची भूमिका!

​अक्षय साकारणार दारा सिंगची भूमिका!

ong>बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने वेगवेगळ्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. तो लवकर रुस्तम-ए-हिंद व अभिनेता दारा सिंगच्या भूमिका साकारताना दिसू शकतो. दारा सिंगच्या आत्मचरित्राच्या विमोचनाप्रसंगी त्याने ही इच्छा व्यक्त केली. अक्षय कुमार म्हणाला, जेव्हा दारा सिंग यांच्यावर बायोपिक तयार केला जाईल तर मी यात नक्कीच काम क रेल. 

अक्षय कुमार २०१६ या वर्षीचा सर्वांत यशस्वी अभिनेता ठरला आहे. या वर्षात त्याच्या तीन चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धमाल केली. अक्षयचे काही चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. अनेक चित्रपटांची शूटिंग त्याने पूर्ण केली असून काही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. एका वर्षी चार-पाच चित्रपट करणारा अक्षय दारा सिंग यांची भूमिका साकारण्यासाठी तयार असला तरी त्याने त्यात एक अट घातली आहे. अक्षय म्हणाला, मी दारा सिंग यांच्या बायोपिकमध्ये तेव्हाच काम करू शकेन जेव्हा माझ्या जवळ अन्य चित्रपट नसतील. कारण दारा सिंग सारखी छांती आणि शरीर बनविण्यासाठी बराच कालावधी लागेल. सातत्याने काम करीत असल्याने सध्या तरी हे शक्य नाही. यासाठी बरीच मेहनत मला घ्यावी लागेल असेही त्याने सांगितले. 

akshay kumar in dara singh biopic

यावेळी उपस्थित असलेला दारा सिंग यांचा मुलगा विधू दारा सिंह म्हणाला, आता अक्षयने दारा सिंग यांच्यावर चित्रपटसाठी होकार दिला आहे. ही आनंदाची गोष्ट असून लवकर दारा सिंग यांच्या बायोपिकवर काम करण्यास सुरुवात केली जाईल. 

अक्षयच्या मते तो लहानपणापासूनच दारा सिंग यांचा फॅन होता. लहानपणी त्याला दारा सिंग यांची भीती वाटत होती. त्याला असे वाटत होते की, दारा सिंग यांच्या पाठीत त्रिशूळ असून त्यांचा तिसरा डोळा कधीही ऊघडू शकतो. मात्र आता मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. 

Web Title: Akshay's role in Dara Singh's role!