'धुरंधर'च्या रिलीजआधीच अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून घेतलेली एक्झिट, निर्मात्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:35 IST2025-12-29T13:33:36+5:302025-12-29T13:35:28+5:30
धुरंधरमुळे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर अक्षय खन्नाच्या डिमांड वाढल्या. त्यामुळे त्याने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र अक्षय खन्नाने धुरंधर सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच 'दृश्यम ३'मधून काढता पाय घेतला होता, असा खुलासा निर्मात्याने केला आहे.

'धुरंधर'च्या रिलीजआधीच अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून घेतलेली एक्झिट, निर्मात्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
अक्षय खन्ना सध्या फक्त 'धुरंधर'मुळेच नव्हे तर 'दृश्यम ३'मुळेही चर्चेत आहे. धुरंधरनंतर अक्षय खन्ना 'दृश्यम ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण, धुरंधरमुळे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर अक्षय खन्नाच्या डिमांड वाढल्या. त्यामुळे त्याने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र अक्षय खन्नाने धुरंधर सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच 'दृश्यम ३'मधून काढता पाय घेतला होता, असा खुलासा निर्मात्याने केला आहे.
ईटाइम्सशी बोलताना 'दृश्यम ३'चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी सांगितलं की धुरंधर प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधीच अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून एक्झिट घेतली होती. ते म्हणाले, "अक्षय खन्नाच्या या निर्णयाने मला धक्का बसला होता. कारण, सिनेमाची कथा ऐकल्यानंतर अक्षय खन्ना 'दृश्यम ३'साठी खूप उत्सुक होता. कथा ऐकवल्यानंतर त्याने दिग्दर्शकाला मिठी मारली होती आणि म्हणाला होता की हा सिनेमा ५०० कोटींची कमाई करेल. त्याची फीदेखील ठरली होती आणि त्याला काही अॅडव्हान्सही देण्यात आला होता. पण, अगदी शेवटच्या क्षणी त्याने सिनेमातून एक्झिट घेतली".
"शुटिंग सुरू व्हायच्या दोन आठवडे आधीच अक्षय खन्नाने मला मेसेज करत सिनेमा करत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याने योग्यप्रकारे सिनेमातून एक्झिट घ्यायला हवी होती. आता तो फोन किंवा मेसेजला उत्तरही देत नाहीये", असा खुलासाही निर्मात्याने केला आहे.
अक्षय खन्नाच्या जागी आता 'दृश्यम ३'मध्ये अभिनेता जयदीप अहलावत आयजी तरुण अहलावतची भूमिका साकारणार आहे. निर्मात्याने सांगितलं की जयदीप एक चांगला अभिनेता आहे. आणि अक्षयपेक्षा चांगली व्यक्ती आहे. अक्षय खन्नाला लीगल नोटीस पाठवली असून अद्याप त्याने त्याचं उत्तर दिलं नसल्याचंही निर्मात्याने स्पष्ट केलं आहे.